इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वासाठी सर्वच संघांनी रणनीती तयार केली आहे. 2008पासून एकही जेतेपद न जिंकलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challangers Bangalore) संघाकडून यंदाही अपेक्षा असणार आहेत. विराट, एबी डिव्हिलियर्स आदी मोठी आणि ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट खेळाडू संघाकडे आहे, परंतु संघाला गरज असते तेव्हा त्यांच्याकडून साजेशी कामगिरी झालेली नाही, हा इतिहास आहे. पण, तरीही RCBच्या चाहत्यांना यंदा विराट बाजी मारेल असा विश्वास आहे. त्यात RCBच्या ताफ्यान नव्यानं दाखल झालेल्या खेळाडूनं इंग्लंड दौऱ्यावर भीमपराक्रमाची नोंद करून IPL मधील प्रतिस्पर्धींना इशाराच दिला आहे.
आयपीएलला सुरू होण्यापूर्वीच RCBचा गोलंदाज केन रिचर्डसन यानं माघार घेतल्याचे जाहीर केलं. तो बाप होणार आहे आणि अशावेळी त्यानं पत्नीसोबत राहण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे रिचर्डसनला बदली खेळाडू कोण, याची सर्वांना उत्सुकता होती. रिचर्डसननं 14 आयपीएल सामन्यांत 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याच्या तोडीचा खेळाडू संघात घेणं अपेक्षित होत आणि तसा डाव RCBनं खेळला.
RCBनं रिचर्डसनच्या जागी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पा याची निवड केली. झम्पानं आयपीएलच्या 11 सामन्यांत 7.55च्या इकॉनॉमी रेटनं 19 विकेट्स घेतल्या आहेत. यूएईच्या वातावरणात येथील खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देणारी आहे, त्यामुळे RCBची ताकद वाढली आहे. झम्पाच्या आगमनानं RCBकडे आता युजवेंद्र चहल, मोइन अली, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद आणि पवन नेगी अशी फिरकीपटूंची फौज तयार झाली आहे.
RCBचा हा डाव यशस्वी ठरणार असे दिसत आहे. IPL 2020साठी UAEत दाखल होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियान खेळाडू
इंग्लंड दौऱ्यावर आहेत. आज या दौऱ्यातील अखेरचा वन डे सामन खेळला जात आहे आणि त्यात झम्पानं कुणालाच न जमलेला पराक्रम केला. तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत 3 विकेट्स घेणाऱ्या झम्पानं वन डे मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. तिसऱ्या आणि अंतिम वन डे सामन्यात झम्पानं 3 विकेट्स घेतल्या.
![]()
इंग्लंड दौऱ्यावर वन डे मालिकेत 10 विकेट्स घेणारा तो पहिला परदेशी फिरकीपटू ठरला. शिवाय तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 10 विकेट्स घेणाराही तो पहिला ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे.
IPL 2020 MI vs CSK : मुंबई इंडियन्सचं पारडं जड, पण चेन्नई सुपर किंग्सचे हे विक्रम मोडणे अशक्यच
इंग्लंड दौऱ्यावरील झम्पाची कामगिरी
पहिली वन डे - 10-0-55-4
दुसरी वन डे - 10-0-36-3
तिसरी वन डे - 10-0-51-3
एकूण - 30-0-142-10
अन्य महत्त्वाच्या बातम्या
बायो बबल म्हणजे काय? ज्याची शिखर धवनने बिग बॉसच्या घराशी केलीय तुलना
चेन्नई सुपर किंग्सच्या अडचणी कमी होईना; MI विरुद्धच्या सामन्याला महाराष्ट्राचा खेळाडू मुकणार
क्या COOL है हम!; विराट कोहली अन् RCBच्या खेळाडूंचे Pool Session; पाहा फोटो
म्हणून तेव्हा पोलार्डने भर मैदानात तोंडावर लावली होती टेप, हे होते कारण
सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या हत्ये प्रकरणी तिघांना अटक; क्रिकेटपटूनं मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? माजी खेळाडूनं सांगितलं 'या' खेळाडूचं नाव
IPL 2020 MI vs CSK सामन्यासाठी आहात सज्ज?; मग रोहित शर्माच्या संघाच्या या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत!
मुंबई इंडियन्सशी कनेक्ट व्हा Whatsapp द्वारे; MI फॅन आहात तर मग हा नंबर लगेच सेव्ह करा!