IPL 2020: मुंबई इंडियन्सशी कनेक्ट व्हा Whatsapp द्वारे; MI फॅन आहात तर मग हा नंबर लगेच सेव्ह करा!

IPL 2020: आपापल्या संघांना चिअर करण्यासाठी प्रत्येक जण तयारीला लागले आहेत. त्यात MIvsCSK हा Opening सामना म्हणजे जणू पर्वणीच. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 05:43 PM2020-09-16T17:43:17+5:302020-09-16T17:44:28+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Now connect with Mumbai Indians on Whatsapp; Check out details | IPL 2020: मुंबई इंडियन्सशी कनेक्ट व्हा Whatsapp द्वारे; MI फॅन आहात तर मग हा नंबर लगेच सेव्ह करा!

IPL 2020: मुंबई इंडियन्सशी कनेक्ट व्हा Whatsapp द्वारे; MI फॅन आहात तर मग हा नंबर लगेच सेव्ह करा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमुंबई इंडियन्सनं सर्वाधिक चार वेळा जिंकता आहे IPLचा किताबरोहित शर्माचा संघ IPL2020च्या सलामीच्या लढतीत CSKशी भिडणार

इंडियन प्रीमिअर लीगमधील ( Indian Premier League) दोन सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) हे IPL2020च्या सलामीच्या सामन्याला 19 सप्टेंबरला एकमेकांशी भिडणार आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात लॉकडाऊनमुळे सर्वांना घरीच रहावे लागले. त्यात क्रीडा स्पर्धाही रद्द झाल्यामुळे त्यांच्या मनोरंजनाचा हक्काचं व्यासपीठही नव्हते. पण, आता IPL2020 सुरू होत असल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहेत.

IPL 2020 MI vs CSK सामन्यासाठी आहात सज्ज?; मग रोहित शर्माच्या संघाच्या या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत!

MIने चार वेळा, तर CSKने तीनवेळा IPL जेतेपद जिंकले आहेत आणि त्यामुळे यो दोन्ही संघांची टशन पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. हा सामना पाहण्यापूर्वी MIच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. मुंबई इंडियन्सनं त्यांच्या चाहत्यांसाठी एक Whatsapp नंबर जाहीर केला आहे. ज्याच्या माध्यमातून MI संघासंबंधीत सर्व अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत. चला तर मग फोन उचला आणि 7977012345 या क्रमांकावर Hi पाठवा... 

जाणून घ्या मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक ( Mumbai Indians Schedule, IPL 2020 )

19 सप्टेंबर - शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
23 सप्टेंबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
28 सप्टेंबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
1 ऑक्टोबर, गुरुवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
4 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3.30 वाजल्यापासून, शारजाह
6 ऑक्टोबर, मंगळवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
11 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी


16 ऑक्टोबर, शुक्रवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
18 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
23 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
25 ऑक्टोबर, रविवार - राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
28 ऑक्टोबर, बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
31 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
3 नोव्हेंबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शाहजाह

मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians Team for IPL 2020) 
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या,  इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

बायो बबल म्हणजे काय? ज्याची शिखर धवनने बिग बॉसच्या घराशी केलीय तुलना  

चेन्नई सुपर किंग्सच्या अडचणी कमी होईना; MI विरुद्धच्या सामन्याला महाराष्ट्राचा खेळाडू मुकणार 

क्या COOL है हम!; विराट कोहली अन् RCBच्या खेळाडूंचे Pool Session; पाहा फोटो  

म्हणून तेव्हा पोलार्डने भर मैदानात तोंडावर लावली होती टेप, हे होते कारण 

सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या हत्ये प्रकरणी तिघांना अटक; क्रिकेटपटूनं मानले मुख्यमंत्र्यांचे आभार 

विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? माजी खेळाडूनं सांगितलं 'या' खेळाडूचं नाव

 

Web Title: IPL 2020: Now connect with Mumbai Indians on Whatsapp; Check out details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.