क्या COOL है हम!; विराट कोहली अन् RCBच्या खेळाडूंचे Pool Session; पाहा फोटो

तगड्या फलंदाजांची फौज असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला इंडियन प्रीमिअर लीगचे ( Indian Premier League) एकही जेतेपद पटकावता आलेलं नाही. संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे होणाऱ्या IPL 2020त विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCBला फेव्हरिट मानलं जात आहे.

तीनवेळा अंतिम फेरीत प्रवेश करूनही कोहलीच्या संघाला जेतेपदानं हुलकावणी दिली. यंदा जेतेपदावर नाव कोरून दुष्काळ संपवण्याचा कोहलीचा निर्धार आहे. त्यासाठी RCBच्या खेळाडूंनी कसून सरावही केला.

सराव शिबिरानंतर RCBच्या खेळाडूंनी पूल व्हॉलिबॉल खेळण्याचा आनंद लुटला. RCB आणि विराट कोहली यांनी सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट केले.

RCBचा पहिला सामना 21 सप्टेंबरला सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाविरुद्ध दुबईत होणार आहे.

RCBनं IPL 2020च्या मोसमासाठी एबी डिव्हिलिअर्स, देवदत्त पडीक्कल, गुरुकीरत सिंह, मोइन अली, मुहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली, वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांना संघात कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ( Royal Challangers Bangalore Team) - एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पड्डीकल, गुरकीरत सिंग, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली. वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, क्रिस मॉरिस, अॅरोन फिंच, केन रिचर्डसन, डेल स्टेन, उदाना, अहमद, फिलिप, देशपांडे.