IPL 2020 MI vs CSK : Mumbai Indians and Chennai Super Kings, check interesting facts about CSK team | IPL 2020 MI vs CSK : मुंबई इंडियन्सचं पारडं जड, पण चेन्नई सुपर किंग्सचे हे विक्रम मोडणे अशक्यच

IPL 2020 MI vs CSK : मुंबई इंडियन्सचं पारडं जड, पण चेन्नई सुपर किंग्सचे हे विक्रम मोडणे अशक्यच

इंडियन प्रीमिअर लीगमधील ( Indian Premier League) दोन सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) हे IPL2020च्या सलामीच्या सामन्याला 19 सप्टेंबरला एकमेकांशी भिडणार आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात लॉकडाऊनमुळे सर्वांना घरीच रहावे लागले. त्यात क्रीडा स्पर्धाही रद्द झाल्यामुळे त्यांच्या मनोरंजनाचा हक्काचं व्यासपीठही नव्हते. पण, आता IPL2020 सुरू होत असल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहेत. आपापल्या संघांना चिअर करण्यासाठी प्रत्येक जण तयारीला लागले आहेत. त्यात MIvsCSK हा Opening सामना म्हणजे जणू पर्वणीच. 

IPL 2020 MI vs CSK सामन्यासाठी आहात सज्ज?; मग रोहित शर्माच्या संघाच्या या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत!

मुंबई इंडियन्सशी कनेक्ट व्हा Whatsapp द्वारे; MI फॅन आहात तर मग हा नंबर लगेच सेव्ह करा!

MIने चार वेळा, तर CSKने तीनवेळा IPL जेतेपद जिंकले आहेत आणि त्यामुळे यो दोन्ही संघांची टशन पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. हा सामना पाहण्यापूर्वी CSK संघांबद्दल मजेशीर ( Interesting IPL facts about Chennai Super Kings) गोष्टी जाणून घ्या, त्याने तुमचाच फायदा होईल.

 

 • IPL च्या एका पर्वात घरच्या मैदानावर सर्वच्या सर्व सामने जिंकणाऱ्या पहिल्या संघाचा मान CSKनं पटकावला. त्यांनी 2011मध्ये घरच्या मैदानावर अपराजित मालिका कायम राखली होती.
 • चेन्नई सुपर किंग्सनं सर्वाधिक 8 वेळा IPLच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यापैकी 3 वेळा त्यांनी बाजी मारली आहे.
 • IPLच्या प्रत्येक पर्वात प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा CSK हा एकमेव संघ आहे.  
 • आयपीएलमध्ये CSKची विजयाची टक्केवारी ही सर्व संघापेक्षा अधिक आहेत. 165 सामन्यांत CSKनं 100 सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांची विजयाची टक्केवारी ही 61.28 इतकी होते.
 • 2008पासून एकच कर्णधार असलेला एकमेव संघ... महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) पहिल्या मोसमापासून CSKच्या कर्णधारपदावर आहे.
 • IPLमधील फेअर प्ले पुरस्कार हा चेन्नई सुपर किंग्सनं सर्वाधिक 6 वेळा जिंकला आहे.
 • 116 धावा करूनही CSKनं विजय मिळवला होता. IPLमध्ये सर्वात कमी धावांचा बचाव करण्याचा विक्रम CSKच्या नावावर आहे. त्यांनी 2009मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबला ( KXIP) 8 बाद 92 धावांत रोखून 24 धावांनी विजय मिळवला होता.
 • CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा IPL मध्ये 100 विजय मिळवणारा पहिलाच कर्णधार आहे.
 • CSKसाठी दोन शतक झळकावण्याचा पराक्रम मुरली विजयनं केला आहे. त्यानं 2010मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध 127 आणि 2012मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध 113 धावा चोपल्या होत्या.
 • IPLच्या एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम CSKच्या ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे. त्यानं 2013मध्ये 32 विकेट्स घेतल्या होत्या.  
 • 2014मध्ये UAEत झालेल्या पाच सामन्यांपैकी CSKनं चार सामने जिंकले होते.

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

बायो बबल म्हणजे काय? ज्याची शिखर धवनने बिग बॉसच्या घराशी केलीय तुलना  

चेन्नई सुपर किंग्सच्या अडचणी कमी होईना; MI विरुद्धच्या सामन्याला महाराष्ट्राचा खेळाडू मुकणार 

क्या COOL है हम!; विराट कोहली अन् RCBच्या खेळाडूंचे Pool Session; पाहा फोटो  

म्हणून तेव्हा पोलार्डने भर मैदानात तोंडावर लावली होती टेप, हे होते कारण 

सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या हत्ये प्रकरणी तिघांना अटक; क्रिकेटपटूनं मानले मुख्यमंत्र्यांचे आभार 

विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? माजी खेळाडूनं सांगितलं 'या' खेळाडूचं नाव

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020 MI vs CSK : Mumbai Indians and Chennai Super Kings, check interesting facts about CSK team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.