IND W vs SL W 4th T20I Live Streaming : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने (IND-W) विजयी हॅटट्रिकचा डाव साधत श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या घरच्या मैदानातील पाच सामन्यांची मालिका खिशात घातली. आता हे दोन्ही संघ मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी पुन्हा समोरासमोर येतील. अट्टापट्टूच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघासमोर उर्वरित दोन सामन्यातील किमान एक सामना जिंकून व्हाइट वॉश टाळण्याचे आव्हाने आहे. दुसरीकडे भारतीय संघ खणखणीत चौकारासह लंकेला क्लीन स्वीप देण्याच्या दिशेनं एक पाउल पुढे टाकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. इथं एक नजर टाकुयात कमालीची कामगिरी करत असलेल्या भारतीय महिला संघाचा श्रीलंकेविरुद्धचा चौथा सामना कधी कुठे आणि कसा पाहता येईल, यासंदर्भातील माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत विरुद्ध श्रीलंका महिला संघातील चौथा टी-२० सामना कधी आणि कुठे खेळवण्यात येणार?
- भारत-श्रीलंका महिला संघातील चौथा टी-२० सामना
- तारीख- रविवार, २८ डिसेंबर
- सामन्याचे ठिकाण- ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम (केरळ)
- सामन्याची वेळ- सायंकाळी ७:०० वाजता
- नाणेफेक- ६:३० वाजता
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग
- टीव्हीवर थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
- लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओस्टार अॅप आणि वेबसाईट
भारतीय महिला संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, वैष्णवी शर्मा, क्रांती गोड, श्री चरणी.
श्रीलंका महिला संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
विश्मी गुणरत्ने, चमारी अट्टापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहारी, कौशानी नुथ्यंगाना (यष्टीरक्षक), माल्की मदारा, इनोक रणवीरा, काव्या कविंदी, शशिनी गिम्हानी
हरमनप्रीत ब्रिगेड पहिल्या तीन सामन्यातील सिलसिला कायम ठेवणार?
वनडे वर्ल्ड कप स्पर्धा गाजवल्यानंतर भारतीय महिला संघ आता आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मैदानातील मालिकेत वर्चस्व राखत टीम इंडियाने या मोहिमेची सुरुवात अगदी जबरदस्त केली आहे. पहिल्या तीन सामन्यात भारतीय संघाने ३ पेक्षा अधिक विकेट गमावल्या नाहीत. एवढेच नाही तर धावांचा पाठलाग करताना १४.४ षटकांच्या आतच सामना संपल्याचेही पाहायला मिळाले. उर्वरित दोन्ही सामन्यात याच कामगिरीची पुनरावत्ती करण्यात भारतीय संघ यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.