तुमच्यावरही देवाचा कॅमेरा आहे..., आर्यन प्रकरणावरून भडकला सोनू सूद 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 05:54 PM2021-10-21T17:54:37+5:302021-10-21T17:54:59+5:30

Mumbai Cruise Drugs Case, Aryan Khan : सोनू सूदचं नाही तर हंसल मेहता, पूजा भटही संतापले... काय आहे कारण?

shahrukh khan mobbed outside arthur jail while visiting aryan khan hansal mehta sonu sood reacts | तुमच्यावरही देवाचा कॅमेरा आहे..., आर्यन प्रकरणावरून भडकला सोनू सूद 

तुमच्यावरही देवाचा कॅमेरा आहे..., आर्यन प्रकरणावरून भडकला सोनू सूद 

googlenewsNext
ठळक मुद्देआर्यन खान गेल्या दोन आठवड्यांपासून तुरुंगात आहे. शाहरुख आर्यनला जामीन मिळावा म्हणून  प्रयत्नशीलही आहे. मात्र अजून त्याला यश आलेले नाही.

Mumbai Cruise Drugs Case : बॉलिवूडचा किंगखान  शाहरुख खान (Shahrukh Khan)आज सकाळी आर्थर रोड तुरुंगात पोहोचला. तुरुंगात बंद असलेल्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला ( Aryan Khan) भेटण्यासाठी शाहरूख आला आणि तुरुंगाबाहेर एकच गर्दी उसळली. जेलबाहेर मीडिया व लोकांनी शाहरूखला असं काही घेरलं की, त्यातून वाट काढता काढता त्याला नाकीनऊ आलं. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेता सोनु सूद (Sonu Sood) यानेही यावर नाराजी व्यक्त करत ट्विट केलं आहे.


 ‘किसी की भावनाओं के पीछे कैमरा लेकर दौडने से पहले याद रखना, ईश्वर का कैमरा आप पर फोकस लगाए बैठा है. क्योंकि हर खबर... खबर नहीं होती,’ असं ट्विट सोनू सूदने केलं आहे.

हंसल मेहता यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. ‘एक सेलिब्रिटी या नात्याने, एक स्टार या नात्याने आणि बॉलिवूडचं वलय असल्यामुळे तुमची भावना, तुमची वेदना, एक वडील या नात्याने तुमची चिंता सार्वजनिक उपभोगाचा, असंवेदनशील वागणुकीचा आणि निर्घृण निर्णयाचा विषय बनते,’अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

पूजा भट हिनेही संताप व्यक्त केला आहे. ‘प्रिय मीडिया, मला माहितीये वेळ कठीण आहे आणि तुमच्यावर संबंधित बाईट घेण्यासाठी वरिष्ठांचा अत्याधिक दबाव आहे. यासाठी मग तुम्हाला तुमचं आरोग्य आणि सुरक्षेशी तडजोड करावी का लागेना. पण तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या या वागण्याबद्दल काय सांगणार? दु:खद’, असं ट्विट तिनं केलं आहे.

आर्यन खान गेल्या दोन आठवड्यांपासून तुरुंगात आहे. शाहरुख आर्यनला जामीन मिळावा म्हणून  प्रयत्नशीलही आहे. मात्र अजून त्याला यश आलेले नाही. एनसीबीनं कोटार्पुढे आर्यनचे व्हाटस अप चॅट सादर करुन आपल्याकडे त्याच्याविरोधात अनेक पुरावे असल्याचे सांगितले आहे. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. त्यावर येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. 
 

Web Title: shahrukh khan mobbed outside arthur jail while visiting aryan khan hansal mehta sonu sood reacts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.