Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > आयातीवरील निर्बंध अन् जागतिक तणावाचा परिणाम; सोन्या-चांदीचे दर घसरले..!

आयातीवरील निर्बंध अन् जागतिक तणावाचा परिणाम; सोन्या-चांदीचे दर घसरले..!

MCX Gold Rate : जाणून घ्या आजचे 'MCX' चे दर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 11:10 IST2026-05-18T11:08:12+5:302026-05-18T11:10:32+5:30

MCX Gold Rate : जाणून घ्या आजचे 'MCX' चे दर!

MCX Gold Rate: Import restrictions and global tensions impact; Gold and silver prices fall..! | आयातीवरील निर्बंध अन् जागतिक तणावाचा परिणाम; सोन्या-चांदीचे दर घसरले..!

आयातीवरील निर्बंध अन् जागतिक तणावाचा परिणाम; सोन्या-चांदीचे दर घसरले..!

MCX Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि भारत सरकारने मौल्यवान धातूंच्या आयातीवर लागू केलेले कडक निर्बंध, यांमुळे आज घरगुती बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी(१८ मे) मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदी घसरणीसह उघडले.

सोमवारी सकाळी ९:०१ वाजता, MCX वर सोन्याचा जून फ्युचर्स करार ०.४७ टक्क्यांनी घसरून १,५७,४१३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. तर, चांदीचा जुलै फ्युचर्स करार १.१ टक्क्यांच्या घसरणीसह २,६८,९०३ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता. या दरवाढीमागे आणि बाजारातील घसरणीमागे प्रामुख्याने तीन मोठी कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

भारत सरकारचे चांदी आयातीवर नवे निर्बंध

काही दिवसांपूर्वीच मौल्यवान धातूंच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर, सरकारने शनिवारी चांदीच्या आयातीवर आणखी कडक पावले उचलली आहेत. नव्या नियमांनुसार, आता व्यापाऱ्यांना देशात चांदी आयात करण्यासाठी सरकारकडून विशेष परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या निर्बंधांमुळे बाजारातील तात्पुरत्या मागणी-पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

अमेरिका-इराणमधील तणाव वाढला

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे. युद्ध संपवण्यासाठी इराणने कोणतीही विश्वासार्ह ऑफर दिली नाही, तर त्यांना अत्यंत भीषण लष्करी परिणामांना सामोरे जावे लागेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या विधानामुळे पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव आणखी वाढला आहे.

'होर्मुझ सामुद्रधुनी' आणि जागतिक बाजारपेठ

'होर्मुझची सामुद्रधुनी' हा व्यापारी मार्ग पूर्ववत सुरू करण्याबाबत कोणतीही ठोस प्रगती न झाल्यामुळे जागतिक स्तरावर महागाईची चिंता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर सुमारे १.३ टक्क्यांनी घसरून ४,४८० डॉलर प्रति औंसच्या आसपास आले आहेत. गेल्या आठवड्यातही आंतरराष्ट्रीय बाजारात सोने जवळपास ४ टक्क्यांनी घसरले होते.

युद्ध सुरू झाल्यापासून सोने १५ टक्क्यांनी घसरले

पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत एकूण १५ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. युद्ध दीर्घकाळ चालल्यास आर्थिक विकासाला खीळ बसेल आणि मध्यवर्ती बँकांना व्याजदरात कपात करावी लागेल, या भीतीने गुंतवणूकदार सध्या सावध भूमिका घेत आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांत सोने एका मर्यादित कक्षेत व्यवहार करत आहे.

(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी अर्थतज्ञाचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title : आयात प्रतिबंधों, वैश्विक तनाव से सोना, चांदी की कीमतों में गिरावट।

Web Summary : आयात प्रतिबंधों और वैश्विक तनाव के कारण सोना और चांदी की कीमतों में गिरावट आई। एमसीएक्स पर सोने के वायदा में 0.47% और चांदी के वायदा में 1.1% की गिरावट आई। नए आयात नियम, अमेरिका-ईरान तनाव और होर्मुज जलडमरूमध्य की चिंताएं गिरावट के प्रमुख कारक हैं।

Web Title : Import restrictions, global tensions cause gold, silver prices to fall.

Web Summary : Gold and silver prices fell due to import restrictions and global tensions. MCX saw gold futures drop 0.47% and silver futures fell 1.1%. New import rules, US-Iran tension, and Hormuz Strait concerns are key factors driving the decline.