Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इराणचे ७ देशांवर हल्ले; बाजारात ब्लॅक डे! तब्बल १२.८७ लाख कोटींची संपत्ती स्वाहा

इराणचे ७ देशांवर हल्ले; बाजारात ब्लॅक डे! तब्बल १२.८७ लाख कोटींची संपत्ती स्वाहा

तेलदरांच्या धक्क्याने गुंतवणूकदार 'लाहीलाही'; तब्बल १२.८७ लाख कोटींची संपत्ती स्वाहा; तेल आणि गॅस दरात उसळी; पश्चिम आशियातील युद्धाच्या तणावामुळे सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये ३% पेक्षा जास्त घसरण, गुंतवणूकदार हवालदिल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 06:43 IST2026-03-20T06:42:29+5:302026-03-20T06:43:10+5:30

तेलदरांच्या धक्क्याने गुंतवणूकदार 'लाहीलाही'; तब्बल १२.८७ लाख कोटींची संपत्ती स्वाहा; तेल आणि गॅस दरात उसळी; पश्चिम आशियातील युद्धाच्या तणावामुळे सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये ३% पेक्षा जास्त घसरण, गुंतवणूकदार हवालदिल 

Iran attacks 7 countries; Black day in the market Wealth of Rs 12 lakh 87 thausands crores wiped out | इराणचे ७ देशांवर हल्ले; बाजारात ब्लॅक डे! तब्बल १२.८७ लाख कोटींची संपत्ती स्वाहा

इराणचे ७ देशांवर हल्ले; बाजारात ब्लॅक डे! तब्बल १२.८७ लाख कोटींची संपत्ती स्वाहा

मुंबई/नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाने तीव्र रूप धारण केले असून, इराणने सात देशांतील तेल व गॅस कंपन्यांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे तेल दराने उसळी घेतली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला असून, घसरणीच्या ‘ब्लॅक डे’मध्ये गुंतवणूकदारांची १२.८७ लाख कोटींची संपत्ती स्वाहा झाली आहे. तेल व गॅस कंपन्यांवरील हल्यामुळे भारतातील गॅस व इंधनाची स्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

इस्रायलने इराणच्या गॅस क्षेत्रावर हल्ला केल्यानंतर इराणनेही खाडी परिसरातील तेल आणि नैसर्गिक वायू प्रकल्पांवर हल्ले तीव्र केले. कतारमधील रास लाफान एलएनजी प्रकल्पावर इराणने क्षेपणास्त्र डागले, तर सौदी अरेबियातील यान्बू येथील सॅमरेफ तेल शुद्धीकरण प्रकल्पावरही हल्ला केला; याशिवाय कुवैतमधील दोन तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि अबू धाबीतील गॅस प्रकल्पालाही लक्ष्य करण्यात आले. 

‘एनर्जी वॉर’च्या दिशेने जातोय आता संघर्ष 
इस्रायल–इराण संघर्षाने आता धोकादायक वळण घेत थेट ‘ऊर्जा युद्ध’चे स्वरूप धारण केले आहे.  जगातील सर्वात मोठे गॅस फील्ड उडवून देऊ, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी  दिला. ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला झाला तर जोरदार प्रत्युत्तर देऊ, असा इशारा इराणनेही दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, कोविड आणि युक्रेन युद्धानंतर ही २०२० च्या दशकातील तिसरी मोठी ऊर्जा संकटस्थिती ठरू शकते.  

संघर्षाची ठिणगी : साउथ पार्स गॅस क्षेत्र
इस्रायलने पर्शियन आखातातील जगातील सर्वात मोठ्या गॅस क्षेत्रांपैकी एक  ‘साउथ पार्स’वर हल्ला केल्यानंतर इराणने हल्ल्यांची तीव्रता वाढवली. या प्रकल्पावर कतारसोबत संयुक्त मालकी आहे.

इराणमध्ये सुमारे ८०% वीज निर्मिती नैसर्गिक वायूवर आधारित आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी म्हटले की, या हल्ल्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. संपूर्ण जगाला त्याचा फटका बसेल. 

ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल ११८ डॉलर्सवर -
ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल ११८ डॉलरपर्यंत पोहोचला असून युद्ध सुरू झाल्यापासून तो ६०% पेक्षा अधिक वाढला आहे. युरोपमधील नैसर्गिक वायूचे दर एका दिवसात १७% वाढले असून गेल्या महिन्यात ते दुप्पट झाले.

Web Title : ईरान का 7 देशों पर हमला; बाजार में भारी गिरावट, अरबों का नुकसान

Web Summary : ईरान के सात देशों में तेल और गैस कंपनियों पर हमलों से तेल की कीमतें बढ़ीं। भारतीय बाजार में भारी गिरावट आई, निवेशकों को अरबों का नुकसान हुआ। गैस क्षेत्रों पर हमलों के बाद ऊर्जा संकट बढ़ने से गैस और ईंधन सुरक्षा खतरे में है।

Web Title : Iran Attacks 7 Nations; Market Plunges, Billions Lost

Web Summary : Iran's attacks on oil and gas firms in seven nations caused oil prices to surge. Indian markets crashed, wiping out billions in investor wealth. Gas and fuel security is threatened as energy conflict escalates following attacks on gas fields.