Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इंस्टाग्रामवर १० हजार 'व्ह्यूज' मिळाले तर किती पैसे मिळतात? रिल्स स्टार्सच्या कमाईचे 'हे' आहे गुपित!

इंस्टाग्रामवर १० हजार 'व्ह्यूज' मिळाले तर किती पैसे मिळतात? रिल्स स्टार्सच्या कमाईचे 'हे' आहे गुपित!

Instagram Income Monetization: जर तुम्ही इन्स्टाग्राम वापरत असाल आणि तुमच्या रिल्सलाही हजारो व्ह्यूज मिळत असतील तर त्यातून तुम्ही पैसे कमावू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:49 IST2026-02-06T11:42:47+5:302026-02-06T11:49:56+5:30

Instagram Income Monetization: जर तुम्ही इन्स्टाग्राम वापरत असाल आणि तुमच्या रिल्सलाही हजारो व्ह्यूज मिळत असतील तर त्यातून तुम्ही पैसे कमावू शकता.

How Much Does Instagram Pay for 10,000 Views in India? Full Breakdown | इंस्टाग्रामवर १० हजार 'व्ह्यूज' मिळाले तर किती पैसे मिळतात? रिल्स स्टार्सच्या कमाईचे 'हे' आहे गुपित!

इंस्टाग्रामवर १० हजार 'व्ह्यूज' मिळाले तर किती पैसे मिळतात? रिल्स स्टार्सच्या कमाईचे 'हे' आहे गुपित!

Instagram Income Monetization : तुम्हालाही रिल्स किंवा व्हिडीओ बनवण्याची आवड असेल तर हा छंद तुमच्या कमाईचे साधन होऊ शकतो. कारण, सध्याच्या काळात 'रिल्स' बनवणे हा केवळ छंद राहिला नसून, तो एक उत्पन्नाचा मोठा स्रोत बनला आहे. अनेक तरुणांच्या मनात प्रश्न असतो की, जर एखाद्या व्हिडिओला १० हजार व्ह्यूज मिळाले, तर इंस्टाग्राम किती पैसे देते? यूट्यूबप्रमाणे इंस्टाग्रामही व्ह्यूजचे पैसे देतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि इंस्टाग्रामवरील कमाईचे नेमके गणित आज आपण जाणून घेऊया.

इंस्टाग्राम व्ह्यूजचे पैसे देतो का?
सर्वात आधी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, इंस्टाग्राम यूट्यूबप्रमाणे थेट 'व्ह्यूज'वर आधारित पैसे भारतामध्ये देत नाही. अमेरिकेसारख्या काही देशांमध्ये इंस्टाग्रामचा 'बोनस' किंवा 'रिल्स प्ले' प्रोग्राम सुरू आहे, जिथे व्ह्यूजवर पैसे मिळतात. भारतात हे फिचर अद्याप अधिकृतपणे सक्रिय करण्यात आलेले नाही. त्यामुळे इंस्टाग्राम स्वतःहून तुमच्या व्ह्यूजसाठी थेट पैसे तुमच्या खात्यात जमा करत नाही.

मग १० हजार व्ह्यूजवर कमाई कशी होते?
भारतात इंस्टाग्राम क्रिएटर्स व्ह्यूजच्या संख्येचा वापर करून इतर मार्गांनी पैसे कमावतात.
१. ब्रँड कोलॅबोरेशन
जर तुमच्या रिल्सवर सतत १० हजार किंवा त्यापेक्षा जास्त व्ह्यूज येत असतील, तर छोटे ब्रँड्स तुमच्याशी संपर्क साधतात.
एका रिलसाठी तुम्हाला ५०० ते २,००० रुपयांपर्यंत मिळू शकतात. तुमचे फॉलोअर्स आणि एंगेजमेंट चांगली असेल, तर ही रक्कम वाढूही शकते.

२. अफिलिएट मार्केटिंग
अनेक क्रिएटर्स आपल्या बायोमध्ये किंवा स्टोरीमध्ये एखाद्या उत्पादनाची लिंक देतात. त्या लिंकवरून कुणी खरेदी केल्यास त्यांना प्रत्येक विक्रीवर ठराविक कमिशन मिळते.

३. पेड प्रमोशन्स
तुमच्याकडे ठराविक प्रेक्षकवर्ग असेल, तर स्थानिक ब्रँड्स किंवा स्टार्टअप्स त्यांचे उत्पादन प्रमोट करण्यासाठी तुम्हाला चांगले मानधन देतात.

लाखोंमध्ये कमाई कधी होते?
जेव्हा तुमचे व्ह्यूज १० हजारांवरून लाखांच्या आणि मिलियनच्या घरात जातात, तेव्हा कमाईचे चित्र पूर्णपणे बदलते. ज्यांचे फॉलोअर्स लाखात आहेत, असे इन्फ्लुएन्सर्स एका पोस्टसाठी ५० हजार ते ५ लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त मानधन घेतात.

वाचा - सोन्या-चांदीचे भविष्यात काय होणार? जागतिक अर्थतज्ज्ञाचा खळबळजनक इशारा; म्हणाले...

नवीन क्रिएटर्ससाठी काही टिप्स

  • सातत्य : रोज दर्जेदार रिल्स अपलोड करा.
  • विशिष्ट विषय : कुकिंग, टेक, फॅशन किंवा फायनान्स यांपैकी एका विषयावर लक्ष केंद्रित करा.
  • एंगेजमेंट: तुमच्या कमेंट्सना उत्तरे द्या, जेणेकरून ब्रँड्सना तुमच्यावर विश्वास बसेल.
     

Web Title : इंस्टाग्राम रील्स: 10,000 व्यूज पर कितनी कमाई होती है?

Web Summary : भारत में इंस्टाग्राम यूट्यूब की तरह सीधे व्यूज के लिए भुगतान नहीं करता। कमाई ब्रांड सहयोग (₹500-₹2,000 प्रति रील), एफिलिएट मार्केटिंग और पेड प्रमोशन से होती है। उच्च जुड़ाव से लाखों फॉलोअर्स वाले प्रभावशाली लोगों के लिए महत्वपूर्ण आय हो सकती है। निरंतर सामग्री और दर्शकों के साथ बातचीत महत्वपूर्ण है।

Web Title : Instagram Reels: How much money do 10,000 views earn?

Web Summary : Instagram doesn't directly pay for views in India like YouTube. Earnings come from brand collaborations (₹500-₹2,000 per Reel), affiliate marketing, and paid promotions. High engagement can lead to significant income for influencers with millions of followers. Consistent content and audience interaction are key.