एचडीएफसीबँकेनं (HDFC Bank) कर्जाच्या व्याजदरात मोठा बदल केला आहे. काही विशिष्ट कालावधीसाठी बँकेनं 'मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट्स' (MCLR) मध्ये ५ बेसिस पॉइंट्स (bps) म्हणजेच ०.०५ टक्क्यांची कपात केली आहे. ज्यांचे कर्ज या व्यवस्थेशी जोडलेलं आहे, अशा कर्जदारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दुसरीकडे, बँकेनं एका विशिष्ट कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये ५ bps ची वाढ देखील केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर ७ मे २०२६ पासून लागू झाले आहेत.
या बदलानंतर एचडीएफसी बँकेचे एमसीएलआर दर आता कर्जाच्या कालावधीनुसार ८.०५% ते ८.६०% दरम्यान आहेत. यापूर्वी हे दर ८.१०% ते ८.५५% च्या दरम्यान होते.
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
HDFC बँकेचे ताजे व्याजदर
बँकेनं ७ एप्रिल २०२६ रोजी केलेल्या शेवटच्या दरातील बदलाच्या तुलनेत काही विशिष्ट कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये बदल केले आहेत :
- ओव्हरनाईट आणि एक महिना: या दरात ५ बेसिस पॉइंट्सची घट झाली असून तो ८.१०% वरून ८.०५% झाला आहे.
- तीन महिने: हा दर ८.२०% वरून कमी होऊन ८.१५% वर आला आहे.
- सहा महिने: एमसीएलआर दर ८.३५% वरून ८.३०% झाला आहे.
- एक वर्ष आणि दोन वर्षे: या कालावधीसाठीचे दर अनुक्रमे ८.३५% आणि ८.४५% वर स्थिर आहेत.
- तीन वर्षे: या कालावधीसाठीच्या दरात ५ बेसिस पॉइंट्सची वाढ झाली असून तो ८.५५% वरून ८.६०% झाला आहे.
