lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > BSNL : १३५ जीबी डेटा, ९० दिवस मोफत कॉलिंग, पाहा ५०० रूपयांपेक्षाही स्वस्त प्लॅन

BSNL : १३५ जीबी डेटा, ९० दिवस मोफत कॉलिंग, पाहा ५०० रूपयांपेक्षाही स्वस्त प्लॅन

पाहा काय मिळणार बेनिफिट्स

By जयदीप दाभोळकर | Published: January 29, 2021 06:20 PM2021-01-29T18:20:04+5:302021-01-29T18:46:48+5:30

पाहा काय मिळणार बेनिफिट्स

BSNL 135 GB data 90 days validity with free calling see plan cheaper than Rupees 500 | BSNL : १३५ जीबी डेटा, ९० दिवस मोफत कॉलिंग, पाहा ५०० रूपयांपेक्षाही स्वस्त प्लॅन

BSNL : १३५ जीबी डेटा, ९० दिवस मोफत कॉलिंग, पाहा ५०० रूपयांपेक्षाही स्वस्त प्लॅन

Highlightsएअरटेल, जिओला हा प्लॅन देणार टक्कर

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL सातत्यानं आपल्या ग्राहकांसाठी काही नवनवीन प्लॅन आणत असते. अनेक युझर्सचा स्वस्तात अनेक बेनिफिट्स मिळण्याकडे असतो. बीसएनएलनं एक ४८५ रूपयांचा प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये मोठी व्हॅलिडिटी, दररोजचा डेटा आमि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसारख्या सुविधा देण्यात येत आहेत.

४८५ रूपयांचा हा एक कॉम्बो प्लॅन आहे. यामध्ये ९० दिवसांची व्हॅलिडिटी, दररोज १.५ जीबी डेटा म्हणजेच ९० दिवसांसाठी १३५ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच यासह कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ मिळतो. या प्लॅनसोबत कोणतीही फेअर युसेज पॉलिसीही लागू होत नाही. याशिवाय या प्लॅसोबत ग्राहकांना दररोज १०० एसएमएसही देण्यात येतात. 

एअरटेल, जिओला टक्कर

बीएसएनएलचा हा प्लॅन एअरटेलच्या ५९८ आणि रिलायन्स जिओच्या ५५५ रूपयांच्या प्लॅनला टक्कर देतो. एअरटेलच्या ५९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येते. तर यासोबत कंपनी ग्राहकांना रोज १.५ जीबी डेटाही देते. याव्यतिरिक्त कोणत्याही नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलचाही लाभ ग्राहकांना मिळतो. रिलायन्स जिओच्या ५५ रूपयांच्या प्लॅनमध्येदेखील हेच बेनफिट्स देण्यात येतात. याव्यतिरिक्त युझर्सना जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.
 

Web Title: BSNL 135 GB data 90 days validity with free calling see plan cheaper than Rupees 500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.