lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani Enterprises: अदानींच्या ‘या’ कंपनीची कमाल; केवळ ५ दिवसांत शेअरमध्ये ३० टक्क्यांची वाढ

Adani Enterprises: अदानींच्या ‘या’ कंपनीची कमाल; केवळ ५ दिवसांत शेअरमध्ये ३० टक्क्यांची वाढ

Adani Enterprises: अदानी समूहातील अदानी एन्टरप्राइजेसच्या शेअरने मागील आठवड्यात दमदार कामगिरी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 07:10 PM2021-06-05T19:10:16+5:302021-06-05T19:12:04+5:30

Adani Enterprises: अदानी समूहातील अदानी एन्टरप्राइजेसच्या शेअरने मागील आठवड्यात दमदार कामगिरी केली आहे.

adani enterprises share price jumps over 30 percent and becomes second most valuable in adani group | Adani Enterprises: अदानींच्या ‘या’ कंपनीची कमाल; केवळ ५ दिवसांत शेअरमध्ये ३० टक्क्यांची वाढ

Adani Enterprises: अदानींच्या ‘या’ कंपनीची कमाल; केवळ ५ दिवसांत शेअरमध्ये ३० टक्क्यांची वाढ

Highlightsअदानी एन्टरप्राइजेसच्या शेअरची दमदार कामगिरीअदानी समूहातील दुसरी मूल्यवान कंपनी

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून अदानी समुहातील अनेक कंपन्यांचे शेअर्स नवीन उंची गाठताना दिसत आहेत. अदानी समूहातील अदानी एन्टरप्राइजेसच्या शेअरने मागील आठवड्यात दमदार कामगिरी केली आहे. अदानी एन्टरप्राइजेसच्या शेअरमध्ये मागील पाच सत्रात ३० टक्के वाढ झाली आहे. या शेअरमधील गुंतवणूक केलेल्यांना मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. (adani enterprises share price jumps over 30 percent)

गेल्या आठवडाभरात अदानी एन्टरप्राइजेसच्या शेअरमध्ये ३० टक्के वाढ झाली आहे. तर याच काळात मुंबई शेअर बाजारात १.५ टक्क्यांनी वधारला आहे. अदानी एन्टरप्राइजेसचे बाजार भांडवल १८७०९९.६९ कोटी इतके झाले असून, अदानी टोटल गॅस या कंपनीला मागे टाकले आहे. अदानी एनर्जी ही समूहातील आघाडीची कंपनी असून कंपनीचे बाजार भांडवल १.९९ लाख कोटी आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनची लस आयात करण्याची परवानगी द्या; Reliance ची केंद्राकडे मागणी

अदानी समूहातील दुसरी मूल्यवान कंपनी

अदानी एन्टरप्राइजेसच्या शेअर शुक्रवारी ७.४३ टक्क्यांनी वधारला आणि १७०१. २० रुपयांच्या नव्या विक्रमी पातळीवर गेला. या तेजीने अदानी एन्टरप्राइजेस ही अदानी समूहातील दुसरी मूल्यवान कंपनी ठरली आहे. आता अदानी समूहातील सर्वात मूल्यवान कंपनी होण्यासाठी अदानी एन्टरप्राइजेस केवळ १० टक्के दूर आहे. 

“मोदी सरकार केवळ श्रेय घेत राहिलं आणि देशात कोरोना वाढत गेला”

    दरम्यान, अदानी एन्टरप्राइजेसला मार्च तिमाहीत २३४ कोटींचा नफा झाला आहे. अदानी एन्टरप्राइजेसच्या तिमाहीत नफ्यात २८४ टक्के वृद्धी झाली आहे. गेल्या वर्षी कंपनीला ६१ कोटींचा नफा झाला होता. ब्लूमबर्ग बिलेनिअरीज इंडेक्सनुसार गौतम अदानी यांची संपत्ती ४२.२ अब्ज डॉलरने वाढली आहे. एकूण ७६ अब्ज डॉलर संपत्तीसह गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत १६ व्या स्थानी आहेत.
     

    Web Title: adani enterprises share price jumps over 30 percent and becomes second most valuable in adani group

    Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.