Will Ajay Devgn play lord shiva in Prabhas and Saif Ali Khan starrer Adipurush | 'आदिपुरूष' मध्ये प्रभास आणि सैफनंतर अजय देवगनची एन्ट्री? 'ही' भूमिका साकारणार असल्याची चर्चा....

'आदिपुरूष' मध्ये प्रभास आणि सैफनंतर अजय देवगनची एन्ट्री? 'ही' भूमिका साकारणार असल्याची चर्चा....

'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा देणारा मराठमोठा दिग्दर्शक ओम राऊत सध्या आपल्या आगामी 'आदिपुरूष' सिनेमाच्या तयारीला लागला आहे. या पौराणिक कथेवर आधारित सिनेमाबाबत सतत काहीना काही अपडेट्स मिळत आहे. आधी प्रभास नंतर सैफ अली खान यांच्या भूमिकांची घोषणा झाल्यावर प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अशात आता या सिनेमासोबत अभिनेता अजय देवगनचं नावही जोडलं जात आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 'आदिपुरूष' च्या मेकर्सनी आधीच या सिनेमात सैफ अली खान लंकेशची म्हणजेच रावणाची भूमिका साकारणार अशी घोषणा केली आहे. तर प्रभास हा रामाची भूमिका साकारणार आहे. अशात आता अभिनेता या सिनेमात भगवान शिवाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण याबाबत मेकर्सकडून काहीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ('आदिपुरूष'मध्ये सैफ साकारणार रावणाची भूमिका, यावर करिनाने तिच्या स्टाईलने दिली प्रतिक्रिया!)

ओम राऊत याने आधीच 'आदिपुरूष'मध्ये प्रभास भगवान रामाची भूमिका साकारणार असल्याची घोषणा केली होती. भलेही  प्रभास मुख्य भूमिकेत असेल, पण सर्वांचं लक्ष सैफ अली खान आणि अजय देवगन या जोडीवर असणारर आहे. कारण या दोघांची जोडी तान्हाजी सिनेमात प्रेक्षकांना खूप पसंत आली होती. दोघांच्याही भूमिकांचं भरभरून कौतुक करण्यात आलं होतं. (Confirm : 'आदिपुरूष'मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणार प्रभास, पण सीता कोण होणार?)

सध्या 'आदिपुरूष' चं प्री-प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. सिनेमाचं शूटींग २०२१ मध्ये सुरू होईल आणि २०२२ मध्ये सिनेमा रिलीज करण्याचा प्लॅन सुरू आहे. महत्वाची बाब म्हणजे हा सिनेमा हिंदी, तेलुगूसहीत इतरही वेगवेगळ्या भाषांमध्ये शूट केला जाणार आहे. तर तमिळ, मल्याळम आणि कन्नडासहीत इतर आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये डब केला जाणार आहे. (प्रभास आणि सैफ अली खानच्या 'आदिपुरूष'मध्ये कियारा अडवाणीची दमदार एन्ट्री?)

दिग्दर्शक ओम राऊत याच्या दिग्दर्शनाची जादू प्रेक्षकांनी तान्हाजी सिनेमात पाहिली आहे. यात अ‍ॅक्शन, स्पेशल इफेक्ट्सचा कमाल पाहून प्रेक्षक भारावले होते. आता तर देशातील सर्वात मोठ्या पौराणिक कथेवर सिनेमा बनत असल्याने यात काय काय आणि कसं कसं दाखवणार याची उत्सुकता आतापासून प्रेक्षकांमध्ये बघायला मिळत आहे. त्यात प्रभास मुख्य भूमिका साकारणार असल्याने जगभरातील त्याचे फॅन्सही या सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Will Ajay Devgn play lord shiva in Prabhas and Saif Ali Khan starrer Adipurush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.