प्रभास आणि सैफ अली खानच्या 'आदिपुरूष'मध्ये कियारा अडवाणीची दमदार एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 11:09 AM2020-09-04T11:09:53+5:302020-09-04T11:13:16+5:30

सैफच्या घोषणेनंतर आता या सिनेमात बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री कियारा अडवाणीची एन्ट्री होताना दिसत आहे.

Kiara Advani to play lead role in Prabhas and Saif Ali Khan's Adipurush? | प्रभास आणि सैफ अली खानच्या 'आदिपुरूष'मध्ये कियारा अडवाणीची दमदार एन्ट्री?

प्रभास आणि सैफ अली खानच्या 'आदिपुरूष'मध्ये कियारा अडवाणीची दमदार एन्ट्री?

googlenewsNext

2020 च्या सुरूवातीला 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा दिल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत त्याच्या आगामी 'आदिपुरूष' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकतीच त्याने घोषणा केली की, प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात सैफ अली खान लंकेशची भूमिका साकारणार आहे. सैफच्या घोषणेनंतर आता या सिनेमात बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री कियारा अडवाणीची एन्ट्री होताना दिसत आहे.

द टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, कियारा अडवाणीला या सिनेमातील भूमिकेसाठी संपर्क करण्यात आला होता. आता अशी आशा केली जात आहे की, निर्माता अधिकृतपणे याची घोषणा लवकरच करतील. याआधी अशी चर्चा सुरू होती की, या सिनेमात साऊथमधील अभिनेत्री किर्ती सुरेश मुख्य भूमिका साकारेल. 

सध्या आदिपुरूषचं प्री-प्रॉडक्शनचं काम सुरू असून २०२१च्या सुरूवातीला सिनेमाचं शूटींग सुरू होण्याची चर्चा आहे. तसेच असाही अंदाज लावला जात आहे की, प्रभास आणि सैफ अली खानचा हा सिनेमा २०२२ मध्ये रिलीज केला जाईल. टी सीरीजच्या बॅनरखाली भूषण कुमार आणि कृष्ण कुमार या सिनेमाची निर्मिती करत आहे. तर ओम राऊत याचं दिग्दर्शन असणार आहे.

कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी 'लक्ष्मी बम' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात ती पहिल्यांदाच खिलाडी अक्षय कुमारसोबत दिसणार आाहे. तसेच कियारा आगामी 'इंदू की जवानी', 'भूल भुलैया २', आणि 'राघव लॉरेंसच्या आगामी 'चंद्रमुखी २' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हे पण वाचा :

अखेर चर्चा खरी ठरली! ‘आदिपुरुष’ सिनेमात ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार लंकेशची भूमिका

'आदिपुरूष'मध्ये सैफ साकारणार रावणाची भूमिका, यावर करिनाने तिच्या स्टाईलने दिली प्रतिक्रिया!

Web Title: Kiara Advani to play lead role in Prabhas and Saif Ali Khan's Adipurush?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.