'आदिपुरूष'मध्ये सैफ साकारणार रावणाची भूमिका, यावर करिनाने तिच्या स्टाईलने दिली प्रतिक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 12:22 PM2020-09-03T12:22:45+5:302020-09-03T12:42:35+5:30

आदिपुरूष' सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतच्या या मेगा बजेट थ्रीडी सिनेमात सैफ अली खान व्हिलनच्या भूमिेकेत दिसणार आहे. तो लंकेशची भूमिका साकारणार आहे. याची माहिती मुव्ही क्रिटीक तरण आदर्शने ट्विटरच्या माध्यमातून दिली.

सुपरस्टार प्रभास 'आदिपुरूष' सिनेमात भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ही बातमी समोर आली तेव्हा त्याच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाबबात उत्सुकता वाढली होती. आता या सिनेमातील व्हिलन फायनल झाला असून लंकेशची भूमिका अभिनेता सैफ अली खान साकारणार आहे. याआधी सैफचा तान्हाजीमधील व्हिलन लोकांना फारच आवडला होता.

'आदिपुरूष' सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतच्या या मेगा बजेट थ्रीडी सिनेमात सैफ अली खान व्हिलनच्या भूमिेकेत दिसणार आहे. तो लंकेशची भूमिका साकारणार आहे. याची माहिती मुव्ही क्रिटीक तरण आदर्शने ट्विटरच्या माध्यमातून दिली.

यावर सैफ अली खानची पत्नी आणि अभिनेत्री करिना कपूरची प्रतिक्रिया आली आहे. तिने सिनेमाचं पोस्टर शेअर करत लिहिले की, 'इतिहासातील सर्वात हॅंडसम दानव...माय मॅन सैफ अली खान'.

या सिनेमाचा निर्माता भूषण कुमार म्हणाला की, 'सैफने तान्हाजी सिनेमात उदयभानची भूमिका साकारून सर्वांनाच चकि केलं होतं. आता तो आदिपुरूष मध्ये आणखी उंच शिखर गाठणार आहे. चांगलं आणि वाईट यांच्यातील लढाईत प्रभाससोबत तो परफेक्ट चॉइस आहे'.

पोस्टरमध्ये लंकेश म्हणजे रावणाला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोस्टरमधून हे स्पष्ट होतं की, हा सिनेमा हिंदीसहीत तेलुगू तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्येही रिलीज होणार होणार आहे.

आदिपुरूष' थ्रीडी हिंदी आणि तेलुगू भाषेत शूट केली जाईल तर तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इतरही काही इंटरनॅशनल भाषेत डब केला जाईल. हा सिनेमा सद्या प्री-प्रॉडक्शन स्टेजवर आहे. याचं शूटींग २०२१मध्ये सुरू होऊ शकतं. तर २०२२ मध्ये सिनेमा रिलीज करण्याचं प्लॅनिंग आहे.

दरम्यान, याआधी सैफ अली खान याने ओम राऊतसोबत तान्हाजी सिनेमात काम केलं होतं. यातही सैफ व्हिलनच्या भूमिकेत होता. त्याची ही भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच पसंत केली होती.

आता तर या सर्वात लोकप्रिय पौराणिक कथेवर आधारित सर्वात मोठा व्हिलन सैफ साकारणार आहेत. त्यामुळे त्याच्या या भूमिकेला बघण्याचीही त्याच्या फॅन्समध्ये कमालाची उत्सुकता वाढली आहे.

आदिपुरूष या सिनेमासाठी राम आणि रावणाची भूमिका फायनल झाली आहे. या सिनेमात सीता कोण असणार याची उत्सुकता वाढली आहे.

ओम राऊतने हे कन्फर्म केलंय की, भगवान रामाची भूमिका प्रभास तर रावणाची भूमिका सैफ साकारणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार, ओम राऊतने काही दिवसांपूर्वी स्क्रीप्ट अभिनेत्री कीर्ती सुरेशला ऐकवल्याचे समजते. पण याबाबत कन्फर्म काहीही सांगण्यात आलेले नाही.

मिड डेच्या एका रिपोर्टनुसार, ओम राऊतने सांगितले की, जेव्हा त्याने या सिनेमात भगवान रामच्या भूमिकेबाबत विचार केला तेव्हा त्याच्यासमोर केवळ आणि केवळ प्रभासचा चेहरा आला होता.तो म्हणाला की, रामाची भूमिका प्रभासपेक्षा चांगली दुसरं कुणी करू शकणार नाही. प्रभास सध्या देशातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक आहे आणि या भूमिकेसाठी त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये शांति आणि आक्रामकता दोन्हीचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.