Why is Twitterati apologising to Hrithik Roshan? | आम्ही चुकलोत आम्हाला माफ कर...! नेटकरी का मागताहेत हृतिक रोशनची माफी?

आम्ही चुकलोत आम्हाला माफ कर...! नेटकरी का मागताहेत हृतिक रोशनची माफी?

ठळक मुद्देहोय,  कंगना राणौत आणि हृतिक रोशनचा वाद तुम्हाला आठवत असेलच. प्रत्येक मुलाखतीत कंगना यावर बोलली आहे.

ट्विटरवर काय ट्रेंड होईल, काय ड्रामा रंगेल सांगता यायचे नाही. सध्या काय तर ट्विटर युजर्स बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची माफी मागताना दिसत आहेत.  देश तुझी माफी मागतोय हृतिक, आम्हाला माफ कर हृतिक, आम्ही चुकलोत आम्हाला माफ कर, असे काय काय कमेंट्स व्हायरल होत आहेत. कारण काय तर कंगना राणौत.
होय,  कंगना राणौत आणि हृतिक रोशनचा वाद तुम्हाला आठवत असेलच. प्रत्येक मुलाखतीत कंगना यावर बोलली आहे. केवळ बोललीच नाही तर हृतिकबद्दल मनात असली नसली सगळी भडास तिने बाहेर काढली होती. त्यावेळी दोघानींही एकमेंकावर आरोपप्रत्यारोपाच्या मयार्दा ओलांडल्या होत्या.  कंगनाने माध्यमासमोर हृतिकला ‘सिली एक्स’ म्हटले होते.  ‘क्रिश 3’ चित्रपटादरम्यान हृतिक आणि आपल्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता. मात्र हृतिकने कंगना खोटे बोलत असल्याचे सांगितले होते. या दोघांमधील वाद इतका वाढला होता की, दोघांनाही याप्रकरणी कायदेशीर मदत घ्यावी लागली. या वादात त्यावेळी अनेकांनी कंगनाची बाजू घेत हृतिकवर टीका केली होती. पण आता हेच लोक या टीकेसाठी हृतिकची क्षमायाचना करत आहेत. 

याला कारण आहे, सध्या कंगना विरूद्ध दिलजीत दोसांज यांच्यातील ट्विटर वॉर. कंगना दिलजीतला नाही नाही ते बोलली. पाठोपाठ हिमांशी खुराणा, जसबीर जस्सी यांच्यावरही आगपाखड केली. त्याआधी कंगना कोणाकोणाबद्दल काय काय बोलली ते तुम्हाला ठाऊक आहे. तिचा हा ‘भांडखोर’ स्वभाव पाहून अनेक नेटक-यांनी आता हृतिकची माफी मागितली आहे. तेव्हा आम्हा तुला वाईट ठरवले, तेव्हा आम्हाला माफ कर, असे नेटकरी म्हणत आहेत. बरे झाले हृतिक कंगनाच्या तावडीतून सुटला, अशी प्रतिक्रियाही नेटकरी देत आहेत.
पाहा नेटक-यांच्या काही मजेदार प्रतिक्रिया...

ओ, करण जोहर के पालतू...! दिलजीत दोसांजच्या टीकेनंतर कंगनाचा थयथयाट 

Kangana Vs Diljit : अभिनेत्याला मिळाला बॉलिवूडचा सपोर्ट, म्हणाले - हिंदुस्तान आणि पंजाबची शान....

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Why is Twitterati apologising to Hrithik Roshan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.