बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घरी क्राईम ब्राँचने छापा मारल्याच्या वृत्तामुळे खळबळ माजली आहे. २० वर्षांपासून एक व्यक्ती सलमानच्या गोराई येथील बंगल्याची देखभाल करत होता. पोलिसांनी छापा मारून त्या व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीला मुंबई पोलिस गेल्या २९ वर्षांपासून शोधत होते. 

पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचं नाव शक्ती सिद्धेश्वर राणा आहे. ६२ वर्षीय असलेला शक्ती सिद्धेश्वर राणा सलमानच्या बंगल्यात काम करत असल्याची माहिती गुप्तहेराने पोलिसांनी दिली होती. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्राँचच्या युनिट नंबर ४ने सापळा रचून सलमानच्या बंगल्यावर छापा मारला. 

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, पोलिसांना पाहताचा राणाने बंगल्यातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी बंगल्याच्या चारी बाजूला घेरलं होतं. त्यामुळे त्याला तिथून पळ काढता आला नाही. पोलिसांनी सांगितलं कीस राणा आणि त्याच्या काही साथीदारांना १९९० साली एका चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर तो जामीनावर सुटला होता. यानंतर तो पोलिसांना चकमा देत राहिला. राणा कोर्टात सुनावणीच्या वेळी न आल्यामुळे त्याच्याविरोधात  अजामीनपात्र वॉरंट जारी झालं. राणा अचानक मुंबईतून गायब झाल्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होती. 


दोन दिवसांपूर्वी राणा एका आलिशान बंगल्यात राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिस जेव्हा गुप्तहेराने दिलेल्या माहितीनंतर त्या ठिकाणी पोहचल्यावर समजलं की हा बंगला सलमान खानचा आहे. क्राईम ब्राँच पोलिसांनी सलमानला माहिती न देता त्याच्या बंगल्यालवर छापा मारला आणि आरोपीला अटक केली. 


२० वर्षांपासून बंगल्यात एक आरोपी काम करत होता, हे सलमानला माहित नव्हते. याप्रकरणी पोलीस सलमान खानचीदेखील चौकशी करणार असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. ते भाईजानकडे राणा त्यांच्या संपर्कात कधीपासून व कसा आला, हे सगळं जाणून घेणार आहे.

Web Title: Who Is Salman Khan Bungalow Care Taker Who Held By Mumbai Crime Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.