ठळक मुद्देमी या पार्टीत खूप दारू प्यायले होते. मी संपूर्णपणे दारूच्या नशेत होते. केवळ मीच नव्हे तर विकी देखील चांगलाच दारूच्या नशेत होतो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहात होतो. त्याच हॉटेलचे गार्डन होते. त्या गार्डनमध्ये मी आणि विकी दोघे देखील अशरक्षः लोळत होतो.

मनमर्जिया या चित्रपटात तापसी पन्नू आणि विकी कौशल यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबतच अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नसला तरी या चित्रपटातील तापसी, विकी आणि अभिषेकच्या कामाचे कौतुक झाले होते. 

मनमर्जिया या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा नुकताच तापसी आणि विकीने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर झालेल्या पार्टीत काय घडले याविषयी त्या दोघांनी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. तापसी सांगते, मनमर्जिया या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर रॅप अप पार्टीत काय घडले ते मी कधीच विसरू शकत नाही. मी या पार्टीत खूप दारू प्यायले होते. मी संपूर्णपणे दारूच्या नशेत होते. केवळ मीच नव्हे तर विकी देखील चांगलाच दारूच्या नशेत होतो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहात होतो. त्याच हॉटेलचे गार्डन होते. त्या गार्डनमध्ये मी आणि विकी दोघे देखील अशरक्षः लोळत होतो. एवढेच नव्हे तर रूममध्ये न जाता मला तिथेच झोपायचे होते यासाठी मी हट्ट करत होते. 

याविषयी पुढे विकीने सांगितले, आम्ही त्याच हॉटेलमध्येच राहात असल्याने रोजचे जेवण झाल्यावर आम्ही त्या गार्डनमध्ये फिरायला येत असू. पण त्या दिवशी तापसी दारुच्या नशेत असल्याने तिला त्याच गार्डनमध्ये रात्रभर झोपायचे होते. तिला हॉटेलमध्ये घेऊन जाण्यासाठी मी खूपच प्रयत्न करत होतो. तू येत नसशील तर मी एकटाच जातो असे देखील मी तिला सांगितले होते. त्या दिवशी घडलेला किस्सा मी कधीच विसरू शकत नाही. 

तापसी लवकरच सांड की आँख या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार असून या चित्रपटात तिच्यासोबतच भूमी पेडणेकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे तर विकी प्रेक्षकांना तख्त या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, करिना कपूर, आलिया भट, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 


Web Title: When Taapsee Pannu got too drunk with Vicky Kaushal and wanted to sleep in the garden
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.