Happy Birthday SRK: जेव्हा गॅंगस्टर अबू सालेमला शाहरूख खानने दिला होता दणका..

By अमित इंगोले | Updated: November 2, 2020 13:53 IST2020-11-02T13:48:47+5:302020-11-02T13:53:50+5:30

हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आधी अंडरवर्ल्डची फारच लुडबुड असायची. शाहरूखला जेव्हा सक्सेस मिळू लागलं होतं तेव्हा त्याला गॅंगस्टर अबू सालेम आणि छोटा शकीलकडून धमक्यांचे फोन येत होते.

When Shah Rukh Khan responded to a threat call from gangster Abu Salem | Happy Birthday SRK: जेव्हा गॅंगस्टर अबू सालेमला शाहरूख खानने दिला होता दणका..

Happy Birthday SRK: जेव्हा गॅंगस्टर अबू सालेमला शाहरूख खानने दिला होता दणका..

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान जवळपास २५ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. २ नोव्हेंबर २०२० ला शाहरूख आपला ५५वा वाढदिवस साजरा करत आहेत. शाहरूखबाबत अनेक गोष्टी आणि किस्से नेहमीच बॉलिवूडमधून ऐकायला मिळतात. त्याचा दिल्ली आणि मुंबईतील स्ट्रगल सर्वांनाच माहीत आहे. पण फार कमी लोकांना माहीत आहे की, एकदा शाहरूख खानने गॅंगस्टर अबू सालेमला चांगलाच दणका दिला होता.

शाहरूखला येत होते धमकीचे फोन

हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आधी अंडरवर्ल्डची फारच लुडबुड असायची. शाहरूखला जेव्हा सक्सेस मिळू लागलं होतं तेव्हा त्याला गॅंगस्टर अबू सालेम आणि छोटा शकीलकडून धमक्यांचे फोन येत होते. अनुपमा चोप्राने तिच्या 'किंग ऑफ बॉलिवूड' पुस्तकात सांगितलं आहे की, एकदा अबू सालेमने आपल्या एका जवळच्या निर्मात्यासोबत काम करण्यासाठी शाहरूख खानवर खूप दबाव टाकला होता. शाहरूखला तो सिनेमा करायचा नव्हता. त्यामुळे त्याने अबू सालेमला तडेतोड उत्तर दिलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार तेव्हा शाहरूख अबू सालेमला म्हणाला होता की, 'कुणावर गोळ्या झाडायच्या हे मी तुला सांगतो का? त्यामुळे तू मला नको सांगू कोणता सिनेमा करायचा आहे'. (शाहरूख खानने कशी खर्च केली होती त्याची 50 रूपयांची पहिली कमाई, आता इतक्या कोटींचा मालक )

शाहरूखने बहादुरीने केला सामना

असेही सांगितले जाते की, शाहरूखला अबू सालेमचा कॉल तेव्हा आला होता जेव्हा तो यश चोप्रांच्या 'दिल तो पागल है' सिनेमाचं शूटींग करत होता. तेव्हा पहिल्यांदाच अबू सालेमन त्याला कॉल केला होता. शाहरूखने सांगितलं होतं की, हा त्याच्यासाठी फार दबावाचा आणि भीतीदायक अनुभव होता. पण तरी त्याने याचा बहादुरीने सामना केला आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी शाहरूख खानची सुरक्षा वाढवली होती.  (शाहरूख खानला त्याच्या आयकॉनिक स्टाइलची वाटते सर्वात जास्त भीती, जाणून घ्या कारण...)

मोठ्या स्ट्रगलनंतर शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं. देव आनंद आणि राजेश खन्नानंतर खऱ्या अर्थाने तोच बॉलिवूडचा रोमॅंटिक सुपरस्टार बनला होता. एकेकाळी शाहरूख खान केवळ रोमॅंटिक सिनेमेच करत होता. त्याला तशाच सिनेमांची ऑफर होत होती. मात्र, नंतर शाहरूखने स्वदेस, चक दे आणि माय नेम इज खान सारखे वेगळ्या भूमिकांचेही सिनेमे केले होते. 
 

Web Title: When Shah Rukh Khan responded to a threat call from gangster Abu Salem