जेव्हा कतरिना कैफ एका अभिनेत्यामुळे सलमान खानसमोरच ढसाढसा रडू लागली!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 04:51 PM2021-11-25T16:51:38+5:302021-11-25T16:59:09+5:30

Katrina Kaif : अनेकदा असंही होतं वादामुळे एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला सिनेमातून काढलं. असंच काहीसं कतरिना कैफसोबत झालं होतं. तेव्हा जॉन अब्राहमने तिला सिनेमातून काढलं होतं. 

When Katrina Kaif cried in front of Salman Khan because of John Abraham | जेव्हा कतरिना कैफ एका अभिनेत्यामुळे सलमान खानसमोरच ढसाढसा रडू लागली!

जेव्हा कतरिना कैफ एका अभिनेत्यामुळे सलमान खानसमोरच ढसाढसा रडू लागली!

Next

बॉलिवूड कलाकारांमध्ये होणारे वाद नेहमीच समोर येत असतात. अलिकडे कोणत्या ना कोणत्या कारणाने कलाकारांमध्ये वाद होत असतात. अनेक कलाकार असेही आहेत ज्यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. अनेकदा असंही होतं वादामुळे एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला सिनेमातून काढलं. असंच काहीसं कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) झालं होतं. तेव्हा जॉन अब्राहमने (John abraham) तिला सिनेमातून काढलं होतं. 

२००३ मध्ये रिलीज झालेल्या जॉन अब्राहमच्या 'साया' सिनेमासाठी आधी कतरिना कैफला साइन करण्यात आलं होतं. पण नंतर जॉन अब्राहमने कतरिना कैफला सिनेमातून काढलं होतं. त्यावेळी कतरिना सलमान खानकडे रडत गेली होती. नंतर यावरून सलमान खान (Salman Khan) आणि जॉन अब्राहममद्ये वैर निर्माण झालं होतं.

ज्या सिनेमातून कतरिना कैफला काढण्यात आलं होतं त्या सिनेमात तिच्या जागी तारा शर्माला साइन करण्यात आलं होतं. कतरिनाला ही बाब फार वाईट वाटली होती आणि यावरून ती सलमान खानकडे खूप रडली होती. 

एका मुलाखतीत सलमान खानने यावर खुलासा केला होता. तो म्हणाला, ” काही वर्षांपूर्वी जॉनने कतरिनाला त्याच्या सिनेमातून काढून टाकलं होतं. तिच्याजागी तारा शर्माला घेण्यात आलं होतं. तेव्हा कतरिना रडतं होती की माझं पूर्ण करिअर संपलं. मी विचार करत होतो की पुढे जाऊन ती मोठी कलाकार होणार आहे मग कशाला रडते. मी तिला म्हणालो देखील आज तू रडतेयस मात्र नंतर तूला ही गोष्ट आठवून तुला हसू येईल.”

२००९ साली कतरिना आणि जॉन अब्राहम ‘न्यूयॉर्क’ सिनेमात एकत्र झळकले होते. यावर सलमान मुलाखतीत म्हणाला,” कतरिना माझ्याकडे आली होती आणि म्हणाली या सिनेमात जॉन आहे. तेव्ही मी म्हणालो तू फक्त सिनेमाची कथा आणि डायरेक्टरवर लक्ष दे.. सह कलाकार तर कुणीही असू शकतो. कतरिनाच्या मनात जॉनने तिला सिनेमातून काढल्याची खंत होती. मात्र कतरिनाला मी समजावलं आज तू अशा जागी आहेस की तू जॉनला काढू शकतेस. मात्र ते योग्य नाही.” असं म्हणत सलमानने कतरिनाची त्यावेळी समजूत घातल्याचं तो म्हणाला.

असं असलं तरी जॉन अब्राहम आणि सलमान खानने 'बाबुल' सिनेमात एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा २००९ मध्ये आला होता. त्यावर्षी कतरिना आणि जॉन अब्राहम ‘न्यूयॉर्क’ सिनेमात एकत्र झळकले होते. या सिनेमामध्ये जॉन असल्याने कतरिना नाराज होती.
 

Web Title: When Katrina Kaif cried in front of Salman Khan because of John Abraham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app