... तेव्हा करण जोहरवर आली होती ढसा-ढसा रडण्याची वेळ, सलमानसमोर गुडघेही टेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 03:27 PM2021-02-11T15:27:56+5:302021-02-11T15:40:24+5:30

करण स्वत: या गोष्टीचा खुलासा एका मुलाखतीत केला होता.

When karan johar bawl loudly in front of salman khan for kuch kuch hota hai | ... तेव्हा करण जोहरवर आली होती ढसा-ढसा रडण्याची वेळ, सलमानसमोर गुडघेही टेकले

... तेव्हा करण जोहरवर आली होती ढसा-ढसा रडण्याची वेळ, सलमानसमोर गुडघेही टेकले

googlenewsNext

करण जोहरचा पहिला सिनेमा ‘कुछ कुछ होता है’ 1998 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका होत्या पण सलमान खानच्या कॅमिओशिवाय हा सिनेमा अपूर्ण मानला जातो.  या सुपरहिट सिनेमा संदर्भातील एका किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तो असा आहे की  करण जोहरसलमान खानसमोर गुडघे टेकून रडला होता.

 ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमातील कॅमिओसाठी करण जोहरला एक मोठा स्टार हवा होता. यासाठी करणने चंद्रचूड सिंहसह अनेक स्टार्सशी चर्चा केली पण गणित काही जुळली नाही. मात्र सलमान खान ही भूमिका साकारण्यासाठी तयार झाल.यानंतर सिनेमाचे शूटिंग सुरु झाले. शाहरुख खानने यात राहुलची,
काजोलने अंजलीची आणि सलमान खानने अमनची भूमिका साकारली होती.

सलमानने सिनेमातील लग्नाच्या सीन्ससाठी सूट घालावा अशी करण जोहरची इच्छा होती, पण सलमान करणला म्हणतो, 'मला एक चांगली कल्पना आहे, मी लग्नात फाटलेली जीन्स आणि टी-शर्ट घालतो. आतापर्यंत कोणीही हे कोठेही पाहिले नाही, लोकांना हे बघून मजा येईल. सलमान खानचे हे बोलणं ऐकून करण जोहरला धक्का बसला आहे, आधी त्याला वाटले सलमान त्याच्यासोबत मस्करी करतो आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, काही वेळाने करण जोहर सलमान खानला म्हणला की तुला सूट घालावा लागेल, त्या सीन्ससाठी जीन्स काही शोभणार नाही, पण सलमान खानने यासाठी नकार दिला. सलमान खानला समजावून करण जोहरला कंटाळा आला आणि ढसा ढसा रडू लागला आणि म्हणाला, "प्लीज हा माझा पहिलाच सिनेमा आहे, असं करू नको." करण जोहर आपल्या गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो की सूट खरचं सर्वात चांगला दिसेल. 

करण जोहरला असे रडताना पाहून सलमान खान चकित झाला आणि म्हणाला, "हो, हो, हो .... तुम्ही चिंता नको करु ... मी घालतो." रडू नकोस, मी तुला ठार मारीन, रडू नकोस. ' रिपोर्टनुसार हा संपूर्ण प्रकार करण जोहरने एका मुलाखती सांगितला होता. 
 

Web Title: When karan johar bawl loudly in front of salman khan for kuch kuch hota hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.