अन् ‘मेट गाला 2019’मध्ये पडता पडता वाचली ‘बार्बी डॉल’ दीपिका पादुकोण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 01:21 PM2019-05-09T13:21:05+5:302019-05-09T13:22:33+5:30

दीपिका पादुकोणने अलीकडे ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. या इव्हेंटच्या रेड कार्पेटवरील दीपिकाचा ‘बार्बी लूक’ चांगलाच हिट झाला. पण इव्हेंटमध्ये दीपिका अगदी पडता पडता बचावली.

when deepika padukone casually tripped at met gala 2019 video viral | अन् ‘मेट गाला 2019’मध्ये पडता पडता वाचली ‘बार्बी डॉल’ दीपिका पादुकोण!

अन् ‘मेट गाला 2019’मध्ये पडता पडता वाचली ‘बार्बी डॉल’ दीपिका पादुकोण!

Next
ठळक मुद्देसध्या दीपिका ‘छपाक’ या चित्रपटात बिझी आहे. मात्र चित्रपटाच्या शूटींगमधून ब्रेक घेत, दीपिका ‘मेट गाला 2019’मध्ये पोहोचली.

दीपिका पादुकोणने अलीकडे ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. या इव्हेंटच्या रेड कार्पेटवरील दीपिकाचा ‘बार्बी लूक’ चांगलाच हिट झाला. पण इव्हेंटमध्ये दीपिका अगदी पडता पडता बचावली. याचा एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतोय.   दीपिकाच्या एका हातात ड्रिंक आहे. ते एन्जॉय करता करता, समोर चालत असताना दीपिकाचा तोल गेला आणि ती पडणार, इतक्यात तिने कसे बसे स्वत:ला सावरले.


याशिवाय दीपिकाचा या इव्हेंटमधील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात ती ‘बाजीराव मस्तानी’मधील ‘दीवानी मस्तानी’ या गाण्यावर डान्स स्टेप करताना दिसतेय. डिझाईनर प्रबल गौरंगने तिचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.


दीपिकाने यावेळी कस्टम मेड पिंक गाऊन परिधान केलेला होता. हा गाऊन डिझाईनर याने डिझाईन केलेला होता. ही यंदाच्या ‘मेट गाला 2019’ची थीम आहे. या थीमला फॉलो करत दीपिकाने 3 डी प्रिंटेड पीसला कम्बाइंड केले. दीपिकाच्या या लूकला शानदार हेयरडोसोबत कम्पलीट केले गेले.

सध्या दीपिका ‘छपाक’ या चित्रपटात बिझी आहे. मात्र चित्रपटाच्या शूटींगमधून ब्रेक घेत, दीपिका ‘मेट गाला 2019’मध्ये पोहोचली.   ‘छपाक’ या चित्रपटात ती अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘छपाक’ मधून दीपिका पादुकोण निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. यात विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची भूमिका साकारत आहे. मेघना गुलजार हा चित्रपट दिग्दर्शित करतेय.

Web Title: when deepika padukone casually tripped at met gala 2019 video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app