बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या खूप बिझी आहे. नुकताच तो अ‍ॅमेझॉन प्राइमवरील सीरिज ब्रीद इन टू द शॅडोमध्ये दिसला होता. त्यानंतर नुकताच त्याचा ल्युडो चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. आता तो लवकरच बॉब बिस्वासमध्ये झळकणार आहे. 

सध्या अभिषेक बॉब बिस्वास चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाचे कोलकातामध्ये चित्रीकरण सुरू आहे. यात अभिषेक बच्चनसोबत अभिनेत्री चित्रांगदा सेन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला वर्षाच्या सुरूवातीला झाली होती पण लॉकडाउनमुळे शूटिंग थांबले होते. आता पुन्हा शूटिंगला सुरूवात होणार आहे.


बॉब बिस्वास सिनेमाच्या सेटवरील अभिषेक बच्चनचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोतील त्याचा लूक इतका वेगळा आहे की त्याला या लूकमध्ये ओळखणंही कठीण झाले आहे. अभिषेकचा हा फोटो त्याच्या फॅन पेजवर शेअर केला आहे. या फोटोत अभिषेक त्याच्या वयापेक्षा खूप मोठा वाटतो आहे. तसेच वजनही वाढलेले दिसत आहे. एका फोटोत तो चित्रांगदासोबत वॉक करताना दिसतो आहे. अभिषेक बच्चनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.


बॉब बिस्वासबद्दल सांगायचं तर या चित्रपटाची निर्मिती रेड चिलीज एण्टरटेन्मेंट आणि सुजॉय घोषच्या बाउंड स्क्रिप्ट प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे.

बॉब बिस्वास हा चित्रपट सुजॉय घोषचा चित्रपट कहानीचा स्पिन ऑफ आहे. या चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात कॉन्ट्रॅक्च किलरचे नाव बॉब बिस्वास होते. ही भूमिका शास्वत चटर्जीने साकारली होती. बॉबची भूमिका खूप लोकप्रिय ठरली होती. हीच भूमिका अभिषेक बच्चन साकारताना सिनेमात दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: What happened to fit and fine Abhishek Bachchan? It is difficult to identify the actor in the photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.