परदेशात नाही तर भारतातील या ठिकाणी रणवीर व दीपिका सेलिब्रेट करणार वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 07:10 PM2019-11-12T19:10:48+5:302019-11-13T11:53:40+5:30

दीपिका व रणवीरनं एकमेकांना सहा वर्षे डेट केल्यानंतर १४ नोव्हेंबर, २०१८ रोजी लग्न केलं होतं

Wedding anniversaries to celebrate Ranveer and Deepika in this place in India, not abroad | परदेशात नाही तर भारतातील या ठिकाणी रणवीर व दीपिका सेलिब्रेट करणार वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी

परदेशात नाही तर भारतातील या ठिकाणी रणवीर व दीपिका सेलिब्रेट करणार वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी

googlenewsNext

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे बी-टाऊनमधले सगळ्यात हॉट कपल पैकी एक आहेत. गतवर्षी १४ नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीर लग्नाच्या बंधनात अडकले. इटलीतील लेक कोमोमध्ये लग्न केल्यानंतर दीपवीरने भारतात तीन ग्रॅण्ड रिसेप्शन दिले होते. दीपवीरचे लग्न अनेक महिने वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिले होते. आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे आणि ते त्यांची वेडिंग अॅनिव्हर्सरी अशी साजरी करणार आहेत.


दीपिका व रणवीर त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस अविस्मरणीय आणि खासगी साजरा करणार आहेत. ते दोघे उद्या तिरूपतीला जाण्यासाठी निघणार आहेत. तिथे ते बालाजी व पद्मावती मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते दोघे त्यांच्या कुटुंबासोबत अमृतसरला जाणार आहेत. तिथे ते गोल्डन टेम्पलला भेट देणार आहेत. त्याच दिवशी मुंबईत परतणार आहेत. 


दीपिका व रणवीर रामलीला चित्रपटानंतर बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकले आहेत. रणवीरने तर बऱ्याचदा ते दोघे भन्साळींमुळे एकत्र आल्याचं सांगितलं. दीपिका व रणवीरनं एकमेकांना सहा वर्षे डेट केल्यानंतर १४ नोव्हेंबर, २०१८ रोजी लग्न केलं.



लग्नानंतर आता ते दोघे ८३ चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट माजी क्रिकेटर कपिल देवच्या जीवनावर आधारीत आहे.

 या चित्रपटात रणवीर कपिल देवची भूमिका साकारणार आहे आणि दीपिका कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या दोघांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Wedding anniversaries to celebrate Ranveer and Deepika in this place in India, not abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.