Watch video actress Gul Panag does push ups in saree | गुल पनागचे साडी नेसून पुश-अप्स, व्हिडीओ पाहून फॅन्स झाले अवाक्....

गुल पनागचे साडी नेसून पुश-अप्स, व्हिडीओ पाहून फॅन्स झाले अवाक्....

बॉलिवूडमधील काही कलाकार आपल्या फिटनेस आणि त्यासाठीच्या डेडिकेशनसाठी ओळखल्या जातात. या लिस्टमध्ये मिलिंद सोमण, टायगर श्रॉफ, मलायका अरोरा, सुष्मिता सेन, दिशा पटानीसारख्या कलाकारांची नावे येतात. या लिस्टमध्ये आणखी एक नाव आहे ते म्हणजे अभिनेत्री गुल पनागचं.गुल पनाग केवळ सुपरफिटच नाही तर ती कामही असं करते की लोक बघतच राहतात. नुकताच गुल पनागने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव राहणाऱ्या गुल पनागने तिचा एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात ती साडी नेसून पुश-अप्स करताना दिसत आहे. गुल पनागचा हा व्हिडीओ बघून तिचे फॅन्स तिचं भरभरून कौतुक करत आहेत. अनेक फॅन्स कमेंट केल्या आहे की, गुल खरंच प्रेरणादायी आहे. 

गुल पनाग केवळ पुश-अप्सपर्यंत मर्यादित नाही. तर गुल बायकर सुद्धा आहे आणि ती तिच्या लग्ना बुलेट चालवत पोहोचली होती तेव्हाही चर्चेत आली होती. गुल फॉर्म्यूला ई ची प्रोफेशनल रेसर राहिली आहे. त्यासोबतच गुल पनागकडे पायलट लायसन्सही आहे. तिने २०१७ मध्ये फायनल टेस्टनंतर पायलटचं लायसन्स मिळवलं होतं.

मिस इंडिया राहिलेल्या गुल पनागने १९९९ मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेतही सहभाग घेतला होता. त्यानंतर ती धूप, जुर्म, डोर, मनोरमा अंडर सिक्स फीट, रण, अबतक छप्पन २, स्टुडंट ऑफ द इअर २ सारख्या सिनेमातही दिसली आहे. इतकेच नाही तर गुल पनाग २०१४ मध्ये आम आदमी पार्टीच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीलाही उभी होती. पण किरण खेर यांनी तिला हरवलं होतं.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Watch video actress Gul Panag does push ups in saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.