vidyut jammwals next will be romantic action thriller titled as khuda hafiz | आणखी एका अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपटात विद्युत जामवालची एन्ट्री!!
आणखी एका अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपटात विद्युत जामवालची एन्ट्री!!

ठळक मुद्दे‘खुदा हाफिज’ या चित्रपटासोबतच विद्युतचा ‘कमांडो 3’ हा सिनेमाही येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालचा ‘जंगली’ हा अ‍ॅक्शन सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून विद्युतला बऱ्याच अपेक्षा होत्या. पण बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. अर्थात याऊपरही विद्युतच्या लोकप्रियतेवर कुठलाही नकारात्मक परिणाम झालेला नाही. ताज्या बातमीनुसार, ‘जंगली’नंतर विद्युतच्या झोळीत पुन्हा एक अ‍ॅक्शन सिनेमा पडला आहे. होय, दिग्दर्शक फारूख कबीर यांच्या चित्रपटात विद्युतची वर्णी लागली आहे. हा चित्रपट कुमार मंगत आणि अभिषेक पाठक प्रोड्यूस करताहेत.


‘खुदा हाफिज’ असे या चित्रपटाचे नाव आहे. याचवर्षी जुलै महिन्यात या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल आणि पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ‘खुदा हाफिज’मध्ये विद्युतच्या अपोझिट कोण दिसेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ‘खुदा हाफिज’मधील अ‍ॅक्शन सीन्ससाठी इंटरनॅशनल अ‍ॅक्शन कोरिओग्राफरची मदत घेतली जाणार आहे. याचा अर्थ हा चित्रपट हॉलिवूडच्या तोडीचा असेल.


या नव्या प्रोजेक्टबद्दल माहिती देताना विद्युतने सांगितले की, हा चित्रपट एका रिअल लाईफ स्टोरीवर बेतलेला आहे. ख-या आयुष्यातील अनेक प्रसंग यात दिसतील.
‘खुदा हाफिज’ या चित्रपटासोबतच विद्युतचा ‘कमांडो 3’ हा सिनेमाही येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. विद्युत जामवालला अनेक लोक देशातील सगळ्यांत मोठा अ‍ॅक्शन स्टार मानतात. तो स्वत:चे स्टंट स्वत: करतो. जगातील आघाडीच्या सहा मार्शल आर्टिस्टमध्ये विद्युतचे नाव घेतले जाते. त्याच्या किलर बॉडीसमोर जॉन अब्राहमही उणा ठरतो. बॉलिवूडमध्ये विद्युतचे नाव प्रकाशझोतात आले ते,‘फोर्स’ या चित्रपटानंतर. जॉन अब्राहम या चित्रपटात लीड रोलमध्ये होता. पण ‘फोर्स’च्या क्लायमॅक्स सीनमध्ये विद्युत भाव खावून गेला होता.


Web Title: vidyut jammwals next will be romantic action thriller titled as khuda hafiz
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.