बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान त्याच्या दबंगगिरीसाठी ओळखला जातो. त्याला जे वाटतं तेच तो करतो. कोणतीही गोष्ट तो बेधडकपणे बोलून मोकळा होता. याच गोष्टीमुळे तो चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर सलमानचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत सलमानच्या समोरच विकी कौशल सलमानची एक्स गर्लफ्रेंड कतरिनासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे आणि हे पाहिल्यावर सलमान खान अशी रिअ‍ॅक्शन देतो की त्याच्या याच रिअ‍ॅक्शनमुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.  


मागच्या काही दिवसांपासून विकी कौशल आणि कतरिना कैफ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. अशात विकी आणि कतरिनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका अवॉर्ड फंक्शनमधील आहे. ज्यात विकी कतरिनाला म्हणतो, तू एखाद्या विकी कौशलला बघून लग्न का नाही करुन टाकत. लग्नाचा सीझन सुरू आहे तर मी तुला विचारतो की, माझ्याशी लग्न करशील का?विकीला असं फ्लर्ट करताना पाहून सलमानला सुद्धा हसू आवरत नाही. विकीचं बोलणं ऐकून तो बाजूला बसलेल्या अर्पिता खानच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपण्याचं नाटक करतो. सलमानचा हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसतो आहे.


मागच्या काही काळापासून विकी आणि कतरिना एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. अर्थात या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मागच्या वर्षी कॉफी विथ करणमध्ये विकीसोबत सिल्व्हर स्क्रिन शेअर करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. 

कतरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती अक्षय कुमारसोबत सूर्यवंशीमध्ये दिसणार आहे. तर विकी कौशल शेवटचा भूत चित्रपटात दिसला होता आणि सरदार उधम सिंग बायोपिकमध्ये झळकणार आहे.

 

Web Title: Video: Vicky Kaushal flirts with Katrina Kaif, Salman Khan gives this reaction TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.