VIDEO: 'धाकड'चं शूटिंग संपताच कंगना राणौतने केली शॉपिंग, विकत घेतली ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 04:39 PM2021-02-17T16:39:03+5:302021-02-17T16:39:36+5:30

कंगना सध्या धाकड चित्रपटाची शूटिंग मध्य प्रदेशमध्ये करते आहे.

VIDEO: Kangana Ranaut did some shopping after the shooting of 'Dhakad' | VIDEO: 'धाकड'चं शूटिंग संपताच कंगना राणौतने केली शॉपिंग, विकत घेतली ही गोष्ट

VIDEO: 'धाकड'चं शूटिंग संपताच कंगना राणौतने केली शॉपिंग, विकत घेतली ही गोष्ट

googlenewsNext

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळी ती वादग्रस्त विधानामुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. कंगना सध्या धाकड चित्रपटाची शूटिंग मध्य प्रदेशमध्ये करते आहे. ती शूटिंगची शिफ्ट संपल्यानंतर बैतूल शहरामध्ये चक्क खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती. तिचा या शॉपिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.


कंगनाच्या समोर आलेल्या व्हिडीओत ती मातीचे भांडे विकत घेताना दिसली. मातीचे भांडे खरेदी करताना ती एका लहान मुलाला त्या बद्दल प्रश्न विचारताना दिसते आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तिचा हा व्हिडीओ फॅन्स पेजवर शेअर करण्यात आला आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ कंगनाने रिट्विट करत म्हटले की, शेवटी नाईट शिफ्ट संपली. काल बैतूलमध्ये खरेदी करण्यासाठी गेले आणि बरीच सुंदर मातीचे भांडे विकत घेतले. मध्य प्रदेशचे कौतुक करण्यासारखे आणि प्रेम करण्याचे बरेच काही इकडे आहे. 


भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या. त्यांची मागणी होती की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे. ती या आंदोलनाला न घाबरता शूटिंग करते आहे. भोपाळला कंगना धाकडचे अ‍ॅक्शन सीन येथे शूट करते आहे. 


कंगनाने काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली होती. यापूर्वी कंगनाने पंगा आणि मणिकर्णिका चित्रपटाचे शूट मध्य प्रदेशमध्ये केले आहे. आता ती तिसऱ्यांदा भोपाळमध्ये शूटिंग करत आहे. 

Web Title: VIDEO: Kangana Ranaut did some shopping after the shooting of 'Dhakad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.