बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. ख्रिसमसच्या निमित्ताने कतरिना कैफने तिच्या घरी एक पार्टी आयोजित केली होती, ज्यापार्टीमध्ये विक्की कौशल सामील झाला होता. याशिवाय करण जोहर, अनन्या पांडे, सिद्धार्थ मल्होत्रा, कबीर खान, ईशान खट्टर, अंगद बेदी आणि नेहा धुपिया यांनीही या पार्टीत हजेरी लावली होती.

कोरोनाच्या आधी विकी कौशल आणि कतरिना कैफ अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मिड डेला दिलेल्या मुलाखतीत विकी कौशल म्हणाले होते की, "डेटिंग करायला काहीच हरकत नाही. ही एक सुंदर भावना आहे." मला समजते की पापाराझी त्यांचे काम करत असतात. ''

"मला हे देखील समजते आहे की मी एक अभिनेता असल्यामुळे लोकांना माझ्या पर्सनल आयुष्यात इंटरेस्ट असतो, हे जरी खरं असले तरी लोकांसोबत काय नाही शेअर करायचे हे पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. मला माझे पर्सनल लाईफ सर्वांसमोर ठेवण्यास कंम्फर्टेबल नाही आणि ते खूप महत्वाचे आहे. ''

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर विकी आगामी सिनेमा महाभारतमध्ये महान आणि अमर योद्धा अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी वजन वाढवणार आहे. तब्बल अश्वत्थामाच्या भूमिकेसाठी विकी 100 किलोपेक्षा जास्त वजन वाढणार आहे. सध्या यासाठीच विकी वर्कआऊट करतो. तो इज्राइल मार्शल आर्ट आणि जपानी मार्शल आर्ट्स शिकणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Vicky kaushal spotted at katrina kaif christmas party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.