Vicky kaushal or rajkummar rao may be enter in dostana 2 in place of kartik aaryan | कार्तिक आर्यननंतर करण जोहरच्या 'दोस्ताना 2'मध्ये विकी कौशल की राजकुमार रावची होणार एंट्री!

कार्तिक आर्यननंतर करण जोहरच्या 'दोस्ताना 2'मध्ये विकी कौशल की राजकुमार रावची होणार एंट्री!

अभिनेता कार्तिक आर्यनला  (Kartik Aaryan करण जोहरने(Karan Johar) 'दोस्ताना 2' चित्रपटातून डच्चू दिला आहे. आता या सिनेमासाठी करण जोहर दुसऱ्या अभिनेत्याचा शोध घेत आहे. कार्तिक आर्यनच्या उद्धाट वागण्यामुळे प्रोडक्शन हाऊसने तिला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवल्याचे बोलले जाते आहे.  20 दिवसांचं शूटिंग केल्यानंतर कार्तिकला चित्रपटाचा दुसरा भाग आवडला नाही.त्याने सिनेमात बदल करण्याची मागणी केली पण करणने हे अजिबात मान्य नव्हते. आता या सिनेमासाठी बी-टाऊनमधल्या दोन अभिनेत्यांची नावं समोर येतायेत. 


करण जोहरच्या (Karan Johar) 'दोस्ताना 2' (Dostana 2) या चित्रपटासाठी विकी कौशल (Vicky Kaushal) आणि राजकुमार राव  (Rajkummar Rao)  यांची नावे चर्चेत आहेत.  टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, विकी कौशलची या सिनेमात एन्ट्री होऊ शकते आणि विकीसोबत चर्चा निष्फळ ठरली तर राजकुमार रावची वर्णी लागू शकते. विकीचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे लवकरच तो या सिनेमाची शूटिंग सुरु करु शकतो. कोरोना होण्यापूर्वी ते मिस्टर लेले चित्रपटाचे शूटिंग करत होते. याशिवाय विकीच्या आणखी 2 सिनेमांवर काम सुरु आहे. आता करण जोहरच्या 'दोस्ताना 2'मधून कार्तिक आर्यन आऊट झाल्यानंतर कोणाची वर्णी लागते हे मेकर्सचं सांगू शकतील. 


चित्रपटाचे शूटींग मुंबई व चंदीगड येथे पूर्ण झाल्याची माहिती आहे. आधी या सिनेमाची शूटिंग  लंडनमध्ये होणार होती, पण कोरोनामुळे 'दोस्ताना 2'चे संपूर्ण शूटिंग भारतातच करण्यात आले. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Vicky kaushal or rajkummar rao may be enter in dostana 2 in place of kartik aaryan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.