vicky kaushal and katrina kaif tried to play hide and seek with paparazzi | Watch Video : विकी कौशल- कतरीना कैफचा ‘लपंडाव’, जाणून घ्या काय आहे ही भानगड
Watch Video : विकी कौशल- कतरीना कैफचा ‘लपंडाव’, जाणून घ्या काय आहे ही भानगड

ठळक मुद्दे काही दिवसांपूर्वी ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानही दोघांचे वागणे बघून यांच्यात काहीतरी शिजतेय, अशी चर्चा सुरु झाली होती.

अनेक तरूणींच्या ‘दिलीची धडकन’ असलेला अभिनेता विकी कौशल याच्या अफेअरच्या चर्चा पुन्हा एकदा जोरात आहे. होय, विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यातील जवळीक सध्या चर्चेत आहे. हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही महिन्यानंतर विकी कतरीनात गुंतल्याचे मानले जात आहे. अर्थात दोघांनीही वेळोवेळी या बातम्या नाकारल्या. पण अलीकडे असे काही झाले की, पुन्हा एकदा विकी व कतरीनाच्या रोमान्सच्या चर्चांना ऊत आला.
अलीकडे विकी व कतरीना दोघेही एका दिवाळी पार्टीत दिसले. पार्टी संपल्यानंतर दोघेही एकत्र बाहेर पडले. पण बाहेर मीडियाला पाहताच दोघांनीही मार्ग बदलला. 

पापाराझींना बघताच कतरीना अक्षरश: भींतीआड लपली.  दुसरीकडे ‘तो मी नव्हेच’ अशा थाटात विकी कतरीनाला इग्नोर करून एकटा कारमध्ये बसून निघून गेला. अर्थात पापाराझींच्या नजरेतून भींतीआड लपलेल्या कतरीनाचा लेहंगा लपला नाही. कतरीना मीडियाला पाहून लपली, हे लगेच सर्वांना कळून आले. पापाराझींनी हा सगळा सीन कॅमे-यात कैद केला.

विकी व ती चांगले मित्र आहेत, असे असेल तर कतरीना का लपली, हे कळायला मार्ग नाही. काही दिवसांपूर्वी ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानही दोघांचे वागणे बघून यांच्यात काहीतरी शिजतेय, अशी चर्चा सुरु झाली होती.  कतरीना आणि विकी शेवटच्या रांगेत एकत्रच चित्रपट पाहायला बसले होते. चित्रपट संपल्यावर विकी आणि कतरिना थिएटरच्या दारापर्यंत एकत्र चालत आले परंतु, बाहेर उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सना पाहून मात्र त्यांनी आपला मार्ग बदलला होता. त्यानंतर कतरीना अभिनेता अर्जुन कपूरसोबत तिच्या गाडीपर्यंत जाताना दिसली होती.

Web Title: vicky kaushal and katrina kaif tried to play hide and seek with paparazzi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.