ठळक मुद्दे‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानही दोघांचे वागणे बघून यांच्यात काहीतरी शिजतेय, अशी चर्चा सुरु झाली होती.  

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यात काहीतरी खिचडी शिजतेय, हे पक्के आहे. कतरिना व विकी आपल्या या रिलेशनशिपबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत, पण लपवून लपणार तरी कसे? आता हेच बघा ना, दोघेही न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी अलिबागला पोहोचलेत. पण दोघांनीही या व्हॅकेशनची कोनाला कानोकान खबर लागू दिली नाही. पण शेवटी लोकांना कळायचे ते कळलेच. कॅटने एक फोटो शेअर केला आणि नकळत तिचे लव्हसीक्रेट उघड झाले. 

होय,कॅटने इन्स्टास्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कारण काय तर कॅटची ‘चोरी’ यानिमित्ताने  उघड झाली आहे. इन्स्टास्टोरीवर शेअर केलेला हा फोटो अलिबागचा आहे. यात कॅट व तिची बहीण इसाबेल एकमेकींच्या बाजूला बसून आहेत. वरवर पाहता या फोटोत विकी कौशल कुठेही दिसत नाही. पण जरा निरखून पाहिल्यावर या फोटोतील मागे काचेत विकीचा चेहरा दिसतोय. चाहत्यांनी फोटोतील  विकीचा चेहरा अगदी सहज शोधून काढला. मग काय, कॅटने नंतर सोशल मीडियावरून तो डिलिट केला. मात्र तोपर्यंत तो व्हायरल झाला होता.

न्यू ईअरच्या पहिल्या दिवशी कतरिनाशिवाय तिची बहीण इसाबेलनेही अलिबाग व्हॅकेशनचे फोटो शेअर केलेत.  विकीनेसुद्धा भाऊ सनीसोबतचे फोटो पोस्ट केलेत. या फोटोतील स्विमिंग पूल आणि सेम बॅकग्राऊंड पाहून विकी, कॅट, इसाबेल आणि सनी हे चौघे अलिबागला एकत्र होते, याचा आणखी एक पुरावा मिळाला.

गतवर्षी अंबानीच्या दिवाळी पार्टीत कतरीना व विकी एकत्र दिसले होते.  पार्टी संपल्यानंतर दोघेही एकत्र बाहेर पडले होते. पण बाहेर मीडियाला पाहताच दोघांनीही मार्ग बदलला होता. पापाराझींना बघताच कतरीना अक्षरश: भींतीआड लपली होती. दुसरीकडे ‘तो मी नव्हेच’ अशा थाटात विकी कतरीनाला इग्नोर करून एकटा कारमध्ये बसून निघून गेला होता . हा सगळा सीन कॅमे-यात कैद झाला होता. 

 ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानही दोघांचे वागणे बघून यांच्यात काहीतरी शिजतेय, अशी चर्चा सुरु झाली होती.  कतरीना आणि विकी शेवटच्या रांगेत एकत्रच चित्रपट पाहायला बसले होते. चित्रपट संपल्यावर विकी आणि कतरिना थिएटरच्या दारापर्यंत एकत्र चालत आले परंतु, बाहेर उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सना पाहून मात्र त्यांनी आपला मार्ग बदलला होता.
‘कॉफी विद करण’या शोमध्ये विकीने कतरिनाला डेट करत असल्याच्या बातम्या नाकारल्या होत्या. कतरिना मला आवडते. पण या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असे तो म्हणाला होता.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'VicKat' fans think Katrina Kaif, Vicky Kaushal are holidaying together; spot similarities in Instagram posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.