वैभव तत्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 06:31 PM2019-11-15T18:31:03+5:302019-11-15T18:31:36+5:30

वैभवने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात त्याने बॉलिवूडच्या अभिनेत्रीसोबत काम करत असल्याचा खुलासा केला आहे.

Vaibhav Tatvavadi will be seen with actress Kajol in Tribhanga | वैभव तत्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत, वाचा सविस्तर

वैभव तत्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत, वाचा सविस्तर

googlenewsNext

हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा अभिनेता वैभव तत्ववादी त्याच्या चित्रपट व भूमिकेमुळे चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. 


वैभवने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोतून समजतंय की तो त्रिभंगा या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरूवात झाली आहे.


न्यू प्रोजेक्टबद्दल सांगितल्यानंतर वैभवने बॉलिवूड अभिनेत्री काजोलसोबत फोटो शेअर केला आहे आणि काजोलबद्दलचं त्याचं मत व्यक्त केलं आहे.


त्रिभंगा या सिनेमाचे दिग्दर्शन रेणुका शहाणे करत असून हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात मुंबईतील एका कुटुंबाची कथा रेखाटण्यात आली आहे. १९८०च्या दशकापासून आतापर्यंत एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांची कथा व त्यांच्या जीवनाशी निगडीत समस्या दाखवले जाणार आहेत. 


वैभव मराठी चित्रपट ‘पाँडिचेरी’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तो सईसोबत दिसणार आहे. या सिनेमात सई व वैभव तत्त्ववादीसोबत अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी दिसणार आहेत. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.


वैभव तत्ववादीने कॉफी आणि बरंच काही, व्हॉट्सअप लग्न यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर त्याने अधिराज्य गाजवले आहे.

बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका यांसारख्या हिंदी चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते. आता वैभव विद्या बालनसोबत काम करणार आहे. प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये वैभव एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Vaibhav Tatvavadi will be seen with actress Kajol in Tribhanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.