urvashi rauthela reaction over shabana azmi accident got trolled | काय म्हणता? उर्वशी रौतेलाने चोरले मोदींचे ट्विट? 

काय म्हणता? उर्वशी रौतेलाने चोरले मोदींचे ट्विट? 

ठळक मुद्दे2018 मध्येही उर्वशीने एका इंटरनॅशनल मॉडेलची पोस्ट आपल्या नावावर खपवली होती.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या हॉट लूकमुळे कायम चर्चेत असते. साहजिकच तिच्या सोशल अकाऊंटवर चाहत्यांची बारीक नजर असते. पण सध्या उर्वशी तिच्या हॉट लूकमुळे नाही तर तिच्या एका ट्विटमुळे चर्चेत आली आहे. होय, अपघातात जखमी झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी लवकरच ब-या व्हाव्यात, असे प्रार्थना करणारे ट्विट उर्वशीने केले आणि ती फसली. होय, उर्वशीने हे ट्विट केले आणि चाहत्यांनी तिची ‘चोरी’ अगदी क्षणात पकडली. 
बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी शनिवारी कार अपघातात गंभीर जखमी झाल्या. त्या लवकर ब-या व्हाव्यात यासाठी बॉलिवूडसह फॅन्सनी प्रार्थना केली आहे. यामध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलाही आहे. तिने आपल्या अकाऊंटवर ट्विट केले. 

‘शबाना आझमी यांच्या गाडीचा अपघात अस्वस्थ करणारा आहे. त्या लवकर ब-या व्हाव्यात यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते’, असे ट्विट तिने केले. पण हे काय, तिचे हे ट्विट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटचा कंटेन्ट अगदी ‘सेम टू सेम’ होता. 

मग काय, उर्वशीला लोकांनी ट्रोल करणे सुरु केले. उर्वशीने मोदींचे ट्विट ‘कॉपी पेस्ट’ केल्याचा आरोप अनेकांनी केला.     

‘उर्वशी कॉपी कॅट, कॉपी पेस्ट करण्यापेक्षा स्वत:च्या मेंदूचा वापर करायला शिक,’असे काय काय युजर्सनी लिहिले.  अशा पद्धतीच्या कमेंट्स करून आणि वेगवेगळे मीम्स तयार करून उर्वशीला ट्विटरवर ट्रोल करण्यात आले.

याआधीही केलीय ‘चोरी’
 2018 मध्येही उर्वशीने एका इंटरनॅशनल मॉडेलची पोस्ट आपल्या नावावर खपवली होती. होय, इंटरनॅशनल मॉडल जीजी हडिडची पोस्ट जशीच्या तशी कॉपी पेस्ट करून आपल्या नावाने खपवली होती. उर्वशी  अनन्या पांडेचा कझिन अहान पांडेसोबत कॉफी डेटवर गेली होती. विशेष म्हणजे, अहानसोबत डेटवर जाताना मीडिया तिथे पोहोचेल, याची खास व्यवस्थाही तिने केली होती. मी कुण्या खास व्यक्तिसोबत डेटवर जातेय, हा संदेश तिने आपल्या पीआरच्या माध्यमातून मीडियापर्यंत पोहोचवला होता. पण कॉफी घेतल्यानंतर रेस्टारंटमधून बाहेर पडताना समोर मीडिया पाहून ती अशी काही रिअ‍ॅक्ट झाली होती की,जणू तिला काही ठाऊकचं नाही.उर्वशीच्या या पब्लिसिटी स्टंटची बातमी मीडियात आली. साहजिकचं ती वाचून उर्वशीचा व्हायचा तो जळफळाट झाला. मग काय, मीडियाला भले-बुरे खूप काही सुनावणारी एक लांबलचक पोस्ट तिने लिहिली होती. उर्वशीची ही पोस्ट चांगलीच गाजली होती.पण तिची ही पोस्टही चोरीची निघाली

 

Read in English

Web Title: urvashi rauthela reaction over shabana azmi accident got trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.