उर्वशी रौतेलाने ट्रोल होताच तो' व्हिडीओ केला डिलीट, पाहून तुम्हीही झाला असतात हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 05:49 PM2020-11-11T17:49:15+5:302020-11-11T18:01:45+5:30

उर्वशी रौतेलाने तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता.

Urvashi rautela shares cleopatra look followers gave funny comment | उर्वशी रौतेलाने ट्रोल होताच तो' व्हिडीओ केला डिलीट, पाहून तुम्हीही झाला असतात हैराण!

उर्वशी रौतेलाने ट्रोल होताच तो' व्हिडीओ केला डिलीट, पाहून तुम्हीही झाला असतात हैराण!

googlenewsNext

उर्वशी रौतेलाची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. बरेच लोक तिच्या सौंदर्याचे चाहते आहेत. सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते आपले फोटो आणि व्हिडिओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकताच त्याचा क्लियोपेट्रा लूकमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यावर चाहत्यांनी मजेदार कमेंट्स केले होता. मात्र काही तासातच उर्वशीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन डिलीट केला आहे. 

 


उर्वशी रौतेलाने तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तिने जबरदस्त मेकअप केलेला दिसत होता. हेड अक्सेसरीज सोबत कानात झूमके लटकत होते.  सिल्व्हर- डायमंड ज्वेलरी आणि गोल्डन आयशॅडो मधील तिचा लूक खूपच आकर्षक आहे. हातात घातलेली रिंग थोडी भयानक दिसत होती. सोशल मीडियावर तिचा हा लूक पाहून तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला. एका यूजरने लिहिले होते, अरे मोरी मैया जे का देख लओ! यूजर्सचे कमेंट्स बघून कदाचित उर्वशीने तो व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरुन डिलीट केला. 


2011 मध्ये उर्वशीने मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला. याचवर्षी तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. भाग जानी, सनम रे अशा चित्रपटात ती दिसली. यानंतर ग्रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट तिच्या झोळीत पडला. अलीकडे तिचा ‘वर्जिन भानुप्रिया’ हा सिनेमा रिलीज झाला होता.

Web Title: Urvashi rautela shares cleopatra look followers gave funny comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.