urmila matondkar hits back kangana ranaut for her comment on for buying office in mumbai | तुम्ही फक्त वेळ आणि जागा सांगा...! नव्या कार्यालयावरून डिवचणाऱ्या कंगनाला उर्मिलांचे खुले आव्हान

तुम्ही फक्त वेळ आणि जागा सांगा...! नव्या कार्यालयावरून डिवचणाऱ्या कंगनाला उर्मिलांचे खुले आव्हान

ठळक मुद्देअगदी अलीकडे उर्मिला मातोंडकर यांनी कंगनावर खरपूस टीका केली होती.

2020 या वर्षात कंगना राणौतने अनेकांशी पंगा घेतला. अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यापैकीच एक. आता 2021 ची सुरुवातही अशाच एका वादाने झालीय. होय, कंगना व उर्मिला यांच्यात वादाची नवी ठिगणी पडली आहे.  उर्मिला यांनी मुंबईत सुमारे 3 कोटी रूपयांचे नवे कार्यालय खरेदी केले आणि कंगनाने उर्मिला यांच्यावर टीकास्त्र सोडले. आता कंगनाच्या या टीकेला उर्मिला यांनी खरमरीत उत्तर दिले आहे. केवळ उत्तर नाही तर थेट आव्हान दिले आहे. तुम्ही जागा आणि वेळ सांगा, मी सगळी फ्लॅट आणि ऑफिसची डॉक्युमेंट्स घेऊन हजर होते. त्याबदल्यात तुम्ही फक्त ड्रग्ज घेणा-यांची ती यादी द्या, अशा शब्दांत उर्मिला यांनी कंगनाला आव्हान दिले आहे.  
उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काही दिवसातच मुंबईत एक आलिशान कार्यालय विकत घेतले. त्यासाठी त्यांनी 3 कोटी रुपये मोजले. ही बातमी ट्वीट करत  कंगनाने अत्यंत खोचक  ट्विट केले. ‘मी एवढ्या मेहनतीने घर बांधलं तेही काँग्रेसने तोडले.  भाजपला साथ देऊन मी काय मिळवले तर 20-25 कोर्ट केसेस. तुमच्याप्रमाणे मी समजदार असते तर मी सुद्धा काँगे्रसला खूश केले असते. किती मूर्ख आहे मी...,’असे उपरोधिक ट्वीट कंगनाने केले. तिच्या या ट्वीटनंतर काही वेळातच उर्मिला यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला.

व्हिडीओत उर्मिला म्हणतात...,
‘कंगना, तुमची माझ्याबद्दलचे जे उच्च विचार आहेत, ते मलाच काय संपूर्ण जगाला माहित झालेत. तुम्ही फक्त वेळ आणि जागा सांगा. मी तिथे हजर होईल आणि सोबत माझ्या मालमत्तेचे कागदपत्रं घेऊन पोहोचेल. मी 2011 मध्ये अंधेरीमध्ये जो फ्लॅट घेतला होता त्याचे मी पेपर्स घेऊन येते. त्यानंतर तो फ्लॅट विकल्याचेही पेपर्स घेऊन येते. मी केलेला हा सर्व व्यवहार राजकारणात येण्याआधी केला होता. याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. मी हे सगळे पुरावे देते. त्या मोबदल्यात तुम्ही तुम्ही फक्त एक काम करा एनसीबीला तुम्ही जी यादी देणार होतात, ती द्या. तुमच्याकडे अशा कोणत्या लोकांची नावे,आहेत याची माहिती मलाच काय पण  देशाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे, असे उर्मिला यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ...?

अगदी अलीकडे उर्मिला मातोंडकर यांनी कंगनावर खरपूस टीका केली होती. मुंबईत आल्या आल्या कंगनाने महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारवर टीका केली होती.‘मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. फक्त बाप्पाची परवानगी तेवढी हवी. ती मिळाली आहे,’ असे ती म्हणाली होती.   तिच्या याच वक्तव्यावर अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी जोरदार टोला लगावला होत्या.
‘माज्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्याबद्दल. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ,’असे खोचक ट्वीट उर्मिला यांनी केले होते.

किती मूर्ख आहे ना मी, नाही? कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरांवर साधला निशाणा

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: urmila matondkar hits back kangana ranaut for her comment on for buying office in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.