kangana ranaut targets urmila matondkar for buying office in mumbai for over rs 3 crore | किती मूर्ख आहे ना मी, नाही? कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरांवर साधला निशाणा

किती मूर्ख आहे ना मी, नाही? कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरांवर साधला निशाणा

ठळक मुद्देअगदी अलीकडे उर्मिला मातोंडकर यांनी कंगनावर खरपूस टीका केली होती.

कंगना राणौत नुकतीच मुंबईत परतली आणि मुंबईत आल्या आल्या तिची टिवटिव सुरु झाली. अर्थात ती थांबली कधीच नव्हती. आता कंगनाने शिवसेना नेत्या व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेससोडून शिवसेनेत येताच उर्मिला यांनी मुंबईच्या खार पश्चिम परिसरातील लिकिंग रोड परिसरात आपल्या कार्यालयासाठी जागा खरेदी केली आहे. या शानदार कार्यालयाची किंमत 3 कोटींपेक्षा अधिक असल्याचे कळते. नेमक्या यावरून कंगनाने उर्मिला यांना लक्ष्य केले आहे.

‘प्रिय उर्मिला मातोंडकरजी, मी स्वत:च्या कष्टाने जे घर बनवले, ते सुद्धा काँगे्रस तोडत आहे. खरोखर भाजपाला खुश करून मी काय मिळवले तर 25-30 केसेस. मी सुद्धा तुमच्यासारखी समजदार असते तर काँग्रेसला खूश केले असते. किती मूर्ख आहे ना मी?’ असे टिष्ट्वट कंगनाने केले आहे.

याशिवाय कंगनाने एक मीमही शेअर केले आहे. कंगनाच्या चाहत्यांनी हे मीम तयार केले आहे. यात कंगना व उर्मिला यांच्यातील ‘वॉर’ला मनोरंजक टच देण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ‘हा हा हा’ असे कॅप्शन कंगनाने दिले आहे.
अभिनयानंतर राजकारणार प्रवेश णा-या उर्मिला मातोंडकर यांची २०२० या वर्षांत खुप चर्चा झाली. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्यापासून शिवसेनेत प्रवेशापर्यंत अशा अनेक गोष्टींमुळे त्या चर्चेत राहिल्या. शिवसेनेत प्रवेस केल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी काही दिवसांतच आपल्या कार्यालयासाठी नवी जागा खरेदी केली आहे. 

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ...?

अगदी अलीकडे उर्मिला मातोंडकर यांनी कंगनावर खरपूस टीका केली होती. मुंबईत आल्या आल्या कंगनाने महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारवर टीका केली होती.‘मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. फक्त बाप्पाची परवानगी तेवढी हवी. ती मिळाली आहे,’ असे ती म्हणाली होती.   तिच्या याच वक्तव्यावर अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी जोरदार टोला लगावला होत्या.
‘माज्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्याबद्दल. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ,’असे खोचक ट्वीट उर्मिला यांनी केले होते.
 

शिवसेनेतील प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकरांनी खरेदी केलं नवं ऑफिस; किंमत पाहून व्हाल थक्क

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ? उर्मिला मातोंडकर यांचा कंगनाला टोला

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kangana ranaut targets urmila matondkar for buying office in mumbai for over rs 3 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.