ठळक मुद्देश्वेता व आदित्य गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2010 मध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण सध्या जाम चर्चेत आहे. कोरोना काळात माझे सगळे सेव्हिंग संपले. मी कंगाल झालोय, असे सांगून आदित्य चर्चेत आला. अर्थात दुस-याच दिवशी मी कंगाल कसा होऊ शकतो, म्हणत आदित्यने घुमजाव केले. आता आदित्यच्या लग्नावरून नवी चर्चा सुरु झालीय. आदित्य लवकरच गर्लफ्रेन्ड श्वेता अग्रवालसोबत लग्न करणार आहे. त्याच्या लग्नाच्या निर्णयावर त्याचे वडील उदित नारायण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत उदित नारायण आदित्यच्या लग्नाबद्दल बोलले. ‘श्वेताला आम्ही खूप दिवसांपासून ओळखतो. ती आदित्यची चांगली मैत्रिण आहे, असे आम्हाला वाटत होते. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत, हे आम्हाला अजिबात माहित नव्हते. एकदिवस आदित्य माझ्याकडे आला आणि मला श्वेतासोबत लग्न करायचे असल्याचे म्हणाला. मी त्यावर एकच बोललो. ते म्हणजे, उद्या काही झाले तर आम्हा आईवडिलांना दोष देऊ नकोस,’ असे उदित नारायण म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘आजपर्यंत आम्ही आदित्यसाठी खूप काही केले. माझ्यासाठी चांगली मुलगी शोधा असे त्याने सांगितले असते तर चांगली मुलगीही शोधली असती. पण आता तो मोठा झाला आहे. त्याचे निर्णय तो घेऊ शकतो. त्याच्या आनंदातच आमचा आनंद आहे. त्यामुळे त्याच्या लग्नासाठी आम्ही उत्सुक आहोत. हे लग्न थाटामाटात व्हावे, अशी आमची इच्छा होती. पण कोरोनाकाळात ते शक्य दिसत नाही. सगळे काही ठीक राहिले तर 1 डिसेंबरला आदित्यचे लग्न होईल. मी आदित्यच्या लग्नात काही लोकांना बोलवू इच्छितो. पण सरकारच्या निर्णया विरोधात मी जाणार नाही.’

श्वेता व आदित्य गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2010 मध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. श्वेताने करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली आहे. श्वेता 2000 मध्ये टीव्ही सीरियल 'बाबुल की दुल्हनिया' मध्ये दिसली होती.यानंतर श्वेता 2001 मध्ये 'शगुन' आणि 2004 मध्ये 'देखा मगर प्यार से' मध्ये दिसली होती. श्वेताने साऊथ फिल्म इंडस्ट्रीबरोबर फिल्मी जगात पाऊल ठेवले. श्वेता शेवटची 2010मध्ये आलेला बॉलिवूड सिनेमा शापितमध्ये आदित्य नारायणसोबत शेवटची दिसली होती. हा एक हॉरर सिनेमा होता.  

नेहा कक्करपाठोपाठ आदित्य नारायणनेही दिली प्रेमाची कबुली; या अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ 

आर्थिक संकटात असलेल्या आदित्य नारायणच्या 'त्या' ट्विटबाबत वडिल उदित नारायण यांचा मोठा खुलासा

यावर्षाअखेरिस करणार लग्न
सध्या आदित्यच्या लग्नाची चर्चा जोरात आहे. मी यावर्षाअखेर लग्न करणार असल्याचे स्वत: आदित्यनेच सांगितले आहे. ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत खुद्द आदित्यने ही माहिती दिली. त्याने सांगितले, ‘मी श्वेताला ‘शापित’ या चित्रपटाच्या सेटवर भेटलो होतो. आमच्या चांगले बॉन्डिंग झाले आणि हळूहळू ती तिच्या प्रेमात पडलो. सुरुवातीला तिला केवळ मैत्री हवी होती. कारण आम्ही दोघेही वयाने लहान होतो. दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे होते. प्रत्येक नात्याप्रमाणेच आमच्या नात्यातही बरेच चढऊतार आलेत. मात्र आमचे नाते अतूट राहिले. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आम्ही लग्न करू शकतो. माझ्या आईवडिलांना श्वेता खूप आवडते.’ 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: udit narayan says if anything happens later do not blame parents on aditya narayan marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.