गेल्या काही दिवसांपासून आदित्य नारायण त्याच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्तेच आहे. तर दुसरीकडे आर्थिक संकटात असल्याचे त्याने सोशल मीडियावर म्हटले होते त्यामुळेही तो चर्चेत होता. काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊनमध्ये आपली सर्व बचत संपली असून केवळ 18 हजार रुपये बँक खात्यात शिल्लक असल्याचे त्याने म्हटले होते. इतकेच नव्हे तर ऑक्टोबरमध्ये काम मिळाले नाही तर जगण्यासाठी आपले सामान आणि बाइक विकावी लागेल, असेही तो म्हणाला होता. आदित्य नारायणवर आर्थिंक तंगी आल्याचे वाचून अनेकांनी आश्चर्यच व्यक्त केले होते. अखेर दिलेल्या मुलाखतीत त्याने या गोष्टीचा खुलासा केला आहे. मी फक्त गंमत केली होती. मला कोणत्याही प्रकारची पैशांची अडचण नाही.

आदित्यच्या ट्वीटवर उदित नारायणनेही स्पष्टीकरण देत म्हटले की, देवाच्या कृपेने आदित्यचे काम चांगले सुरू आहे. त्याच्यावर असे कोणत्याही प्रकराचे आर्थिक संकट ओढावलेले नाही. जरी त्याला आर्थिक संकट असेल तर त्याच्यासाठी मी अजून जीवंत आहे.आयुष्यात खूप कष्ट करून मी जे काही कमावले ते सर्व आदित्यसाठी आहे.' प्रसारमाध्यमांमध्ये येणा-या बातम्यांवर आधी मलाही हसू आले होते. आदित्यला म्हणायचे होते दुसरे आणि त्याचा आर्थ काही वेगळाच काढण्यात आला असावा असा काय तो प्रकार झाला असावा असे मला वाटते.

डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात आदित्यचे लग्न होणार आहे. अशा बातम्या वाचल्यानंतर आदित्यच्या सासरच्या मंडळींवर काय परिणाम होईल याचा विचार करायला नको का? ते कसे काय आपली मुलगी आदित्यच्या हातात देतील. आदित्यकडे पैसे नसतील तर तो त्याच्या पत्नीची जबाबदारी कशी घेईल उगाच असे टेंन्शन देणा-या अफवा पसरवल्या गेल्या आहेत.

 

माझ्या मुलाने मला किंवा त्याच्या आईला कधीही त्याच्याकडे पैसे नाहीत असे सांगितले नाही. त्यामुळे माध्यमांमध्ये येणा-या आदित्यविषयीच्या बातम्या या निव्वळ अफवा असल्याचे उदित नारायण यांनी म्हटले आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Udit Narayan's big revelation On Aditya Narayan Financial Crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.