ठळक मुद्देश्वेता व आदित्य गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2010 मध्ये त्यांची पहिली भेट झाली होती.

इंडियन आयडल 11 च्या सेटवर आदित्य नारायण नेहा कक्करच्या प्रेमात वेडा झाला होता. इतका की, गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली होती. लग्नाची तारीखही ठरली होती. पण हे लग्न, लग्नाची तारीख हा सगळा खटाटोप नुसत्या टीआरपीसाठी होता. टीआरपीच्या टॉप लिस्टमध्ये जागा मिळवण्यासाठी शो सुरु असेपर्यंत हा ड्रामा रंगला आणि शो संपल्यावर हा ड्रामाही संपला. आता मात्र रिअर लाईफमध्ये नेहा व आदित्यने आपआपला जोडीदार निवडला आहे.
अलीकडे इंडियन आयडलची जज व सिंगर नेहा कक्कर हिने रोहनप्रीत सिंगसोबतचे आपले नाते कन्फर्म केले. आता इंडियन आयडलचा होस्ट आदित्य नारायण यानेही लग्नाची घोषणा केली आहे.  गर्लफ्रेन्ड श्वेता अग्रवालसोबत आदित्य लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. यावर्षीच्या अखेरिस हा लग्नसोहळा होणार आहे.

ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत खुद्द आदित्यने ही माहिती दिली. त्याने सांगितले, ‘मी श्वेताला ‘शापित’ या चित्रपटाच्या सेटवर भेटलो होतो. आमच्या चांगले बॉन्डिंग झाले आणि हळूहळू ती तिच्या प्रेमात पडलो. सुरुवातीला तिला केवळ मैत्री हवी होती. कारण आम्ही दोघेही वयाने लहान होतो. दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे होते. प्रत्येक नात्याप्रमाणेच आमच्या नात्यातही बरेच चढऊतार आलेत. मात्र आमचे नाते अतूट राहिले. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आम्ही लग्न करू शकतो. माझ्या आईवडिलांना श्वेता खूप आवडते.’
पुढे त्याने सांगितले, काही वर्षांपूर्वी माझे व श्वेताचे बे्रकअप झाल्याची चर्चा पसरली होती. यानंतर श्वेतासोबत बाहेर जाणे कठीण झाले होते. नात्यात मतभेद होतात. पण याचा अर्थ नाते संपते, असे नाही. आम्ही दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. आता लग्नाची वेळ आलीये, असेही तो म्हणाला.

म्हणून मी शांत राहिलो...
मी माझे व श्वेताचे नाते कधीच लपवले नाही. पण एकेकाळी आमच्या नात्यांबद्दल खूप चर्चा सुरु झाल्या होत्या. अशावेळी मी शांत राहणे पसंत केले आणि लोकांनी मला एकटे सोडले.

दहा वर्षांपासून नात्यात
श्वेता व आदित्य गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2010 मध्ये त्यांची पहिली भेट झाली होती.

नेहा कक्कर म्हणाली, तू माझा आहेस... 

अलीकडे इंडियन आयडलची जज व सिंगर नेहा कक्कर हिने रोहनप्रीत सिंगसोबतचे आपले नाते कन्फर्म केले.  होय, रोहनप्रीतवरचे प्रेम तिने कबुल केले. गेल्या काही दिवसांपासून नेहा व रोहनप्रीत यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. नेहा या महिन्याच्या अखेरिस रोहनप्रीतसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या होत्या. आता खुद्द नेहानेच सोशल मीडियावर एक गोड फोटो आणि एका गोड कॅप्शनसह या प्रेमावर शिक्कामोर्तब केले. नेहाने रोहनप्रीतसोबतचा एक फोटो शेअर केला. ‘तू माझा आहेस...,’ असे या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले. सोबत ‘नेहूप्रीत’ असा हॅशटॅगही दिला. सध्या नेहूप्रीतचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

PHOTOS: जाणून घ्या कोण आहे रोहनप्रीत सिंग ?, ज्याच्यासोबत लग्न करणार आहे नेहा कक्कर

नेहा-आदित्यचे लग्न अन् नारायण कुटुंबाचा ‘लाभ’; वाचून पडाल चाट

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: after neha kakkar aditya narayan confirms his relationship with shaapit co-star shweta agarwal set to marry on this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.