फक्त मनोरंजनासाठी रियाचे आयुष्य पणाला लावू नका..! ट्विंकल खन्ना ‘मीडिया ट्रायल’वर भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 11:27 AM2020-09-14T11:27:01+5:302020-09-14T11:38:52+5:30

 रियाला पाठींबा देत ट्विंकलने रियाविरोधात सुरु असलेल्या या ‘मीडिया ट्रायल’वर तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

twinkle khanna support rhea chakraborty on media trial | फक्त मनोरंजनासाठी रियाचे आयुष्य पणाला लावू नका..! ट्विंकल खन्ना ‘मीडिया ट्रायल’वर भडकली

फक्त मनोरंजनासाठी रियाचे आयुष्य पणाला लावू नका..! ट्विंकल खन्ना ‘मीडिया ट्रायल’वर भडकली

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांत सिंग प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर येताच एनसीबी अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये आली. याप्रकरणी एनसीबीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा स्टाफ सॅम्युअल मिरांडा यांना अटक केली आहे. 

सुशांत सिंग राजपूतप्रकरणी रिया चक्रवर्तीच्या ‘मीडिया ट्रायल’वर अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आता अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने यावर जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. रियाला पाठींबा देत ट्विंकलने रियाविरोधात सुरु असलेल्या या ‘मीडिया ट्रायल’वर तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ मनोरजंनासाठी एका व्यक्तिचे पणाला लावू नका, असे तिने म्हटले आहे.
टाईम्स ऑफ इंडियात लिहिलेल्या लेखात ट्विंकलने सुशांत प्रकरण आणि रिया चक्रवर्ती यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विंकल लिहिते...
एखादा जादुगार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे जादुचे खेळ दाखवतो, अगदी तसाच प्रकार मीडियात सुरु आहे. मीडिया अँकर्स वेगवेगळ्या बातम्या पसरवून लोकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. जादुगार एका मुलीला बॉक्समध्ये बंद करून जादुचे खेळ दाखवतो. याचप्रमाणे रियाचे मीडिया ट्रायल सुरु आहे. मीडिया अँकर लाखो प्रेक्षकांसमोर रियाचे आयुष्याची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. मला मला प्रश्न पडतोय मीडियाचे हे जादुगार कॅमेरा बंद झाल्यावर स्वत:ला काय विचारत असतील? लाखो लोकांचं मनोरंजन करण्यासाठी तुम्ही एका व्यक्तीचे आयुष्य डावावर लावता, अशा आशयाचा ब्लॉग लिहून ट्विंकलने रियाला पाठिंबा दर्शवला आहे.

सुशांतच्या चाहत्यांनी घेतला क्लास
ट्विंकलची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होताच ती ट्रोल झाली. सुशांतच्या चाहत्यांनी ट्विंकलला जबरदस्त ट्रोल केले. केवळ ट्विंकलच नाही तर तिच्यासोबत अक्षय कुमारलाही ट्रोल केले गेले.

‘हिचा ड्रग्ज रॅकेटशी काही संबंध आहे का? नाही तर ही रिया चक्रवर्तीचे समर्थन का करतेय? आता #BehenPlsMeraNaamMaatLena ची भीती असल्याने #BollywoodDrugGangने रियाला पाठींबा देणे सुरु केले आहे,’ असे एका युजरने लिहिले.

एका युजरने अक्षय कुमार व ट्विंकलला लक्ष्य केले. ‘ हे जे काही लिहितात वा पोस्ट करतात त्याच्यासाठी त्यांना पैसे मिळतात. ते कधीच सत्याला पाठींबा देत नाही. त्यांना हवा पैसा. पैसा त्यांच्यासाठी सर्वकाही आहे,’असे एका युजरने लिहिले.

ट्विंकल खन्नाला वडिलांनी दिला होता एकाचवेळी 4 बॉयफ्रेन्ड बनवण्याचा सल्ला, कारण ऐकून थक्क व्हाल

‘टॉप फिल्ममेकर’मुळे लागला होता सुशांतला ड्रग्जचा ‘चस्का’; रियाचा दावा!!

रियाच्या नशिबी तुरुंगात चटईवर झोपणं

सुशांत सिंग प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर येताच एनसीबी अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये आली. याप्रकरणी एनसीबीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा स्टाफ सॅम्युअल मिरांडा यांना अटक केली आहे. रिया भायखळा तुरुंगात बंद आहे. आज सोमवारी रियाचे वकील हायकोर्टात तिची जामीन याचिका दाखल करू शकतात. यापूर्वी दोनदा तिला जामीन नाकारण्यात आला. हायकोर्टातही रियाला जामीन मिळू शकला नाही तर तुरुंगातील तिचा मुक्काम आणखी वाढणार आहे.
 

Web Title: twinkle khanna support rhea chakraborty on media trial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.