The topless photo of Jackie Shroff's daughter Krishna Shroff Viral On Internet, see her sexy style | जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाचा TOPLESS फोटो आला समोर,पाहा तिचा सेक्सी अंदाज
जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाचा TOPLESS फोटो आला समोर,पाहा तिचा सेक्सी अंदाज

जॅकी श्रॉफच्या पाऊलावर पाऊल ठेवत मुलगा टायगर श्रॉफने सिनेसृष्टी आपले नशीब आजमवत सा-यांच्या पसंतीची पावती मिळवली आणि बॉलिवूडमध्ये आज आपले एक स्थान निर्माण केले आहे. टायगरच्या पाठोपाठ त्याची बहीण मात्र ग्लॅमर इंडस्ट्रीपासून लांबच राहणे पसंत करते. सध्या ती तिच्या बॉयफ्रेंडमुळेही चर्चेत आहे. कृष्णा सोशल मीडियावरही सतत अॅक्टीव्ह असते.  


तिच्या इंस्टाग्रामवर नजर टाकली तर स्वतःचे बोल्ड अंदाजातील फोटो तिने शेअर केले आहेत. तिच्या या सेक्सी फोटोंची खमंग चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या तिच्या या फोटोंमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. खांद्यावरुन खाली रुळणारे केस, टॅटू दाखवणारी उघडी पाठ आणि घायाळ करणारी नजर अशा सेक्सी पोझमधील तिचे फोटो सोशल मीडियात तुफान हिट झाले.


टॉपलेस फोटोंनंतर आता पुन्हा एकदा कृष्णाचा सेक्सी अंदाज चर्चेचा विषय ठरला आहे. कृष्णाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हॉट अंदाजातील फोटो शेअर केली आहेत. यापैकी एका फोटोमध्ये ती ब्लॅक कलरच्या बिकिनीत दिसतेय. तिचा हा अंदाज बघणा-यांना नक्कीच घायाळ करणारा आहे. एकंदरीतच काय तर सध्या चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या कृष्णाचा रूपेरी पडद्यावर नसला तरी सोशल मीडियावर बोलबाला आहे हे मात्र नक्की.

Web Title: The topless photo of Jackie Shroff's daughter Krishna Shroff Viral On Internet, see her sexy style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.