न्यू इअर सेलिब्रेट करून भारतात परतले टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 12:33 IST2021-01-02T12:32:40+5:302021-01-02T12:33:07+5:30

मालदीववरुन दिशा आणि टायगर भारतात परतले आहेत. यावेळी ते दोघे ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसले.

Tiger Shroff and Disha Patani return to India to celebrate New Year | न्यू इअर सेलिब्रेट करून भारतात परतले टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी

न्यू इअर सेलिब्रेट करून भारतात परतले टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी

अभिनेत्री दिशा पटानी सतत या ना त्या कारणांनी चर्चेत असते. कधी टायगर श्रॉफमुळे, कधी आदित्य ठाकरेंसोबतच्या मैत्रीमुळे तर कधी हॉट फोटो व व्हिडीओंमुळे. काही दिवसांपूर्वी दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ मालदीवमध्ये गेले होते आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळाले होते. त्यानंतर आता ते दोघे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन मालदीवमध्ये करून भारतात परतले आहेत. नुकतेच ते दोघे मुंबई एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले.

मालदीववरून दिशा आणि टायगर भारतात परतले आहेत. यावेळी ते दोघे ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसले. या दरम्यान टायगरने काळ्या रंगाचा स्लीवलेस टीशर्टसोबत काळ्या रंगाची ट्रॅक पँट आणि त्यावर स्टायलिश व्हाइट स्नीकर्स घातले होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी काळ्या रंगाचा मास्कदेखील लावला होता. तर अभिनेत्री दिशाने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला होता. यावेळी तिने देखील ब्लॅक ट्रॅक पँटसोबत व्हाइट मास्क लावला होता.


टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो गणपत ः पार्ट १मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला या वर्षी म्हणजेच २०२१ला सुरूवात होणार आहे आणि हा चित्रपट २०२२ला रिलीज होईल. या चित्रपटाचा आणखीन एक भाग येणार आहे. टायगरने सोशल मीडियावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केला होता.


तर दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती सलमान खानसोबत राधेः योर मोस्ट वाँटेड भाईमध्ये दिसणार आहे. याशिवाय दो व्हिलन, केटिना या चित्रपटातही काम करताना दिसणार आहे.

Web Title: Tiger Shroff and Disha Patani return to India to celebrate New Year