Throwback: तिच्यामुळे सलमान खानचे करिअर उद्ध्वस्त झाले! सोहेल खानचा आरोप!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 11:40 AM2019-02-05T11:40:17+5:302019-02-05T11:59:34+5:30

ऐश्वर्याच्या आरोपानंतर सोहेल प्रचंड संतापला होता. एका मुलाखतीत त्याने ऐश्वर्याला लक्ष्य केले होते.

Throwback: When Sohail Khan held Aishwarya Rai responsible for destroying Salman Khan's life | Throwback: तिच्यामुळे सलमान खानचे करिअर उद्ध्वस्त झाले! सोहेल खानचा आरोप!!

Throwback: तिच्यामुळे सलमान खानचे करिअर उद्ध्वस्त झाले! सोहेल खानचा आरोप!!

googlenewsNext
ठळक मुद्देविवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्याच्या नात्यावरही सोहेल बोलला होता.

सलमान खान आणि ऐश्वर्या रायचे अफेअर बॉलिवूडच्या चर्चित अफेअरपैकी एक आहे. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले. या ब्रेकअपसाठी सलमानचा रागीट स्वभाव आणि त्याने तिला केलेली मारहाण कारणीभूत असल्याचा आरोप स्वत: ऐश्वर्याने एका मुलाखतीत केला होता.  आमच्या ब्रेकअपनंतर सलमानने मला फोनवर वाट्टेल ते बोलला. इतकेच नाही तर तो नेहमी माझ्या को-स्टार्ससोबत माझे अफेअर असल्याचा संशय घ्यायचा. मी त्याकाळात अभिषेक बच्चनपासून ते शाहरुख खानपर्यंत सगळ्याच मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करत होती. प्रत्येकासोबत तो माझे नाव जोडत होता. सलमानने अनेकदा मला मारहाणदेखील केली होती, असे ती म्हणाली होती. तिचे हे आरोप आठवण्याचे कारण म्हणजे, सलमानचा भाऊ सोहेल खान याची सध्या व्हायरल होत असलेली एक जुनी मुलाखत.

होय, ऐश्वर्याच्या आरोपानंतर सोहेल प्रचंड संतापला होता. एका मुलाखतीत त्याने ऐश्वर्याला लक्ष्य केले होते. त्याच्या या मुलाखतीचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आज ती (ऐश्वर्या राय) लोकांसमोर रडतेय. पण एकेकाळी तीच सलमानसोबत फिरत होती. आमच्या घरी येत होती.आमच्या कुटुंबाचा भाग म्हणून वावरत होती.  तिने कधीच सलमानवरचे प्रेम व्यक्त केले नाही. यामुळे सलमान सतत असुरक्षित वाटायचे. ती आपल्यावर किती प्रेम करते, हे सलमानला जाणून घ्यायचे होते. पण तिने कधीच तिच्या प्रेमाची कबुली दिली नाही. तिने लावलेल्या आरोपांमुळेच सलमानचे आयुष्य उध्वस्त झाले, असे सोहेल या मुलाखतीत म्हणाला होता.
विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्याच्या नात्यावरही सोहेल बोलला होता. त्यावेळी फोनवरून ती सलमानच्या संपर्कात होती. यामुळे विवेक संतापला होता, असे सोहेलने या मुलाखतीत सांगितले होते.

Web Title: Throwback: When Sohail Khan held Aishwarya Rai responsible for destroying Salman Khan's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.