‘या’ थरारपटांनी प्रेक्षकांना केले भयभयीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 04:37 PM2019-08-20T16:37:39+5:302019-08-20T16:51:57+5:30

बॉलिवूडमध्ये आपण नानाविध आयशाचे चित्रपट पाहिले असतील. यात बहुतांशजणांना रोमॅँटिक चित्रपट जास्त आवडतात. मात्र गेल्या काही वर्षांत असे दिसून आले आहे की, थरारपटांनीदेखील प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले आहे. विशेषत हे थरार चित्रपट मनोरंजनाच्या कॅटेगरीत एकदम टॉपला आहेत. आज आपण अशाच काही थरारपटांबाबत जाणून घेऊया ज्यांनी मनोरंजनाबरोबरच प्रेक्षकांना थिएटरमध्ये भयभयीत केले.

These movies terrified the audience! | ‘या’ थरारपटांनी प्रेक्षकांना केले भयभयीत!

‘या’ थरारपटांनी प्रेक्षकांना केले भयभयीत!

googlenewsNext

-रवींद्र मोरे
बॉलिवूडमध्ये आपण नानाविध आयशाचे चित्रपट पाहिले असतील. यात बहुतांशजणांना रोमॅँटिक चित्रपट जास्त आवडतात. मात्र गेल्या काही वर्षांत असे दिसून आले आहे की, थरारपटांनीदेखील प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले आहे. विशेषत हे थरार चित्रपट मनोरंजनाच्या कॅटेगरीत एकदम टॉपला आहेत. आज आपण अशाच काही थरारपटांबाबत जाणून घेऊया ज्यांनी मनोरंजनाबरोबरच प्रेक्षकांना थिएटरमध्ये भयभयीत केले.

* वजीर
बुद्धिबळाशी सांगड घातलेला हा एक थरारपट आहे. रिअल लाइफमध्येही बुद्धिबळाचा खेळ कसा रंगत जातो आणि एक शुल्लक प्यादाही राजाला कसं मात देतं. हे ह्या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. त्या प्याद्याकडे क्षुद्र म्हणून कधीच दुर्लक्ष करायचं नसतं. कारण एका ठराविक ठिकाणी पोहचल्यावर त्याच्याकडे वजीरा इतकीच ताकद येते. वजीरची सुरूवातच जबरदस्त आहे. कथानकाला गती आहे आणि ते अजिबात भरकटत नाही. त्यात वजीरची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तरची जबरदस्त अदाकारी.

* कहानी- 2


थोडं रहस्य, थोडा थरार अशा खास गोष्टींनी बनलेला ‘कहानी -2’ एक डार्क मूव्ही आहे. २०१२ मधील ‘कहानी’ या चित्रपटापेक्षा यात नवीन कथा आणि नवी पात्र आहेत. विद्या बालनने यावेळी विद्या बागची नाही तर विद्या सिन्हा साकारली आहे, तिच्या मुलीचं म्हणजेच मिनीचं अपहरण होतं आणि विद्या तिला शोधायला निघते. मात्र रस्त्यात एक दुर्घटना घडते, त्यामुळे ती कोमात जाते. प्रकरणाचा शोध लावण्यासाठी इन्स्पेक्टर इंद्रजीत सिंह (अर्जुन रामपाल) हॉस्पिटलमध्ये पोहचतो आणि तो विद्याला कुख्यात गुन्हेगार दुर्गा रानी सिंह समजतो, जिच्या मागावर अनेक वर्षांपासून पोलिस आहेत. आता विद्या आणि दुर्गा एक आहेत का? दुर्गा गुन्हेगार का झाली? इंद्रजीत सिंह तिला कसा ओळखतो? याचं कोडं हळू हळू ह्या कथेत उलगडत.

*रहस्य
मनीष गुप्ता दिग्दर्शित चित्रपट 'रहस्य' च्या संबंधात दिग्दर्शकाने असे म्हटलं आहे की, ही कथा आरुषी हत्याकांडावर आधारीत नाही. मात्र चित्रपट पाहिल्यावर लगेच कळतं की, कथा ही आरुषी केसवरच बेतलेला आहे. फक्त फरक इतकाच आहे की, दिल्ली ऐवजी ही घटना मुंबईत घडली आहे असं दाखवण्यात आलं. या चित्रपटात खून झालेल्या लहान मुलीची म्हणजेच आयेशाची भूमिका साक्षी सेमने साकारली आहे. आशीष विद्यार्थी आणि टिस्का चोपडाने तिचे डॉक्टर आई-बाप वठवले आहेत आणि केके मेननने प्रकरणाचा छडा लावणाऱ्या सीबीआय आॅफिसरची भूमिका साकारली आहे.

* दृश्यम


२०१५ मध्ये रिलीज झालेला निशिकांत कामतने दिग्दर्शित केलेला ‘दृश्यम’ हा एक थ्रिलर-ड्रामा आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका अजय देवगण, श्रिया सरन आणि तब्बू यांनी साकारली आहे. कुमार मंगत पाठक, अजीत आंध्रे आणि अभिषेक पाठक यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मूळ लेखक जीतू जोसेफने लिहिलेली आणि २०१३ साली प्रदर्शित झालेला 'दृश्यम' हा मल्याळम चित्रपटाचं हिंदी रूपांतरण आहे. चित्रपटांमध्ये अजय देवगणच्या पत्नीचा रोल तामीळ अभिनेत्री श्रिया सरनने केला आहे. विशेष म्हणजे यात अभिनेत्री तब्बूची फार महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

* एन-एच 10


नवदीप सिंहने दिग्दर्शित केलेला एन एच 10 हा एक भारतीय क्राइम थ्रिलर मुव्ही आहे. या चित्रपटांमध्ये भारतातील महिलांची स्थिती, त्यांच्यावरील पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा, त्यातून घडणारं आॅनर किलिंग आणि भारतातली कायदा व्यवस्था या सगळ्या गोष्टी खूप चतुराईने मांडल्या आहेत. यात अनुष्का शर्मा आणि नील भूपलम प्रमुख भुमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अनुष्का शर्मा चित्रपट निर्मितीमध्ये उतरली आहे. चित्रपटाची कथा सुरू होते ती रोड ट्रीपला निघालेल्या जोडप्याने. हे जोडप सापडतं गुंडांच्या तावडीत आणि मग सुरु होतो पाठलागाचा थरार खेळ.

Web Title: These movies terrified the audience!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.