तारा सुतारियाचा साडीतला फोटो पाहून नेटीझन्सची सटकली आणि अक्षरश तिची लाजच काढली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 07:02 PM2021-02-08T19:02:03+5:302021-02-08T19:08:50+5:30

तारा सुतारियाल तिच्या एका साडीमुळे जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

Tara Sutaria brutally trolled for Wearing Pink Saree With White Sleevesless Blouse | तारा सुतारियाचा साडीतला फोटो पाहून नेटीझन्सची सटकली आणि अक्षरश तिची लाजच काढली

तारा सुतारियाचा साडीतला फोटो पाहून नेटीझन्सची सटकली आणि अक्षरश तिची लाजच काढली

googlenewsNext

सेलिब्रेटी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ती सक्रिय असते तिचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो ती शेअर करत असताता. त्यामुळे सेलिब्रेटी कधी कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल होईल हे सांगता येत नाही.अनेकदा सेलिब्रेटींचे स्टायलिश ड्रेसिंग सेन्स पाहून    काही जण त्यांचं कौतुक करतात तर अनेकजण त्यांना ट्रोलही करतात. 

 

'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या अफेअरमुळे किंवा आगामी सिनेमामुळे ती चर्चेत आली असे नसून यावेळी तिच्या फॅशन स्टाइलमुळे तिने लक्ष वेधून घेतले आहे. अनेकदा फॅशन सेन्समुळे त्यांच्यावर टीका होते. याच कारणामुळे तारा सुतारियादेखील सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. 

साडी परिधान केलेला फोटो पाहून चाहत्यांची सटकलीच आणि त्यांनी तिच्या या फोटोंवर विचित्र कमेंट करत तिला ट्रोल केले. ताराला  तिच्या एका साडीमुळे जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. यावेळी तारा तिच्या साडीमुळे नाही तर गुलाबी साडीवर पांढ-या रंगाच्या स्लिव्हजलेस ब्लाऊजमुळे ट्रोल झाली आहे. काहींनी तिच्या फॅशनसेन्सवरच टीका करायला सुरुवात केली. गुलाबी रंगावर पांढ-या रंगाचे ब्लाऊज घालणे काहींना काही रुचले नाही. त्यामुळे अतिशय संतप्त प्रतिक्रीयाही तिच्या याफोटोंवर पाहायला मिळत आहे. एका युजरने म्हटले की, भारतीय पेहरावायची तरी लाज ठेवा, कपडे घालण्याची पद्धत तशी शिकून घ्या. 


बॉलिवूडमधील लव्हबर्ड्स तारा सुतारिया आणि आदर जैन लवकरच लग्न करणार असल्याचे समजते आहे. त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दलचा खुलासा इंस्टाग्रामवर केला होता. आता त्यांच्या लग्नाच्या चर्चेनंतर चाहत्यांचे त्यांच्याकडे लक्ष लागून राहिले आहे. स्पॉटबॉयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर जैन लवकरच गर्लफ्रेंड तारा सुतारियासोबत सात फेरे घेणार आहे. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खूप सीरियस आहेत आणि ते लवकरच लग्नबेडीत अडकण्याची शक्यता आहे.

Web Title: Tara Sutaria brutally trolled for Wearing Pink Saree With White Sleevesless Blouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.