'तानाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमातील 'या' अभिनेत्रीचे बोल्ड फोटो आले समोर, तर अशा मिळतायेत कमेंटस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 11:15 AM2019-11-25T11:15:02+5:302019-11-25T11:20:31+5:30

नेहा शर्माने ‘तुम बिन २’, 'क्या सुपर कुल है हम' , 'यंगिस्तान' , 'यमला पगला दिवाना' आदि सिनेमांमध्ये तिने आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखविली.

Tanhaji: The Unsung Warrior Movie Actress Neha Sharma Neha Sharma turns heat on with hot pics On Internet | 'तानाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमातील 'या' अभिनेत्रीचे बोल्ड फोटो आले समोर, तर अशा मिळतायेत कमेंटस

'तानाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमातील 'या' अभिनेत्रीचे बोल्ड फोटो आले समोर, तर अशा मिळतायेत कमेंटस

googlenewsNext

इंटरनेट सेन्सेशन अभिनेत्रींच्या यादीत नेहा शर्माचेही नाव गणले जाते. बेधडक, बोल्ड आणि बिनधास्त फोटोशूट करत ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नेहा आता मिळालेल्या वेळात मस्त व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तिथे ही ती आपल्या विवध पोजमधील फोटो कॅप्चर करत असून सोशल मीडियावर शेअर करत आहे. कधी सन किस्ड फोटो तर कधी बिकनीमधील बोल्ड फोटो काढत ती तिच्या चाहत्यांसह शेअऱ करत आहे. नेहा शर्माचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडतो. त्यामुळे ऑन एंड ऑफस्क्रीन लूकमधील प्रत्येक फोटोला चाहत्यांकडून भरभरून लाईक्स आणि कमेंटस मिळत असतात. नेहा शर्माने 2007 साली तेलगु सिनेमातून आपल्या अभिनयाला सुरूवात केली होती. 


नेहा आता अजय देवगणचा 'तानाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. ओम राऊतने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे  'तानाजी: द अनसंग वॉरियर' हा सिनेमा तिच्या करिअरमधील सगळ्यात मोठा सिनेमा आहे. सिनेमात ती कमला देवीच्या भूमिकेत झळकणार आहे.


‘तुम बिन २’, 'क्या सुपर कुल है हम' , 'यंगिस्तान' , 'यमला पगला दिवाना' आदि सिनेमांमध्ये तिने आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखविली. एफएचएम या मॅगेझिनने नेहाचे जगातील सर्वाधिक सेक्सी महिलांच्या यादीत सातवे स्थान दिले होते. त्यावेळी तिच्या सौंदयार्ची सर्वदूर चर्चा रंगली होती.
  

Web Title: Tanhaji: The Unsung Warrior Movie Actress Neha Sharma Neha Sharma turns heat on with hot pics On Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.