'या' अभिनेत्याने 'भगत सिंह' यांच्याशी केली कंगनाची तुलना, वाचा नेमका काय म्हणाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 10:29 AM2020-09-11T10:29:22+5:302020-09-11T10:36:16+5:30

विशाले ट्विट करून लिहिले की, 'क्वीन' महराष्ट्र सरकारचा सामना करत लोकांसाठी एक उदाहरण कायम करतेय की, काही चुकीचं झालं तर सरकार विरोधात आवाज उठवला गेला पाहिजे.

Tamil actor Vishal is all praise for Kangana Ranaut; compares her to Bhagat Singh | 'या' अभिनेत्याने 'भगत सिंह' यांच्याशी केली कंगनाची तुलना, वाचा नेमका काय म्हणाला!

'या' अभिनेत्याने 'भगत सिंह' यांच्याशी केली कंगनाची तुलना, वाचा नेमका काय म्हणाला!

googlenewsNext

अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यात पेटलेल्या वादावर लोकप्रिय तमिळ अभिनेता विशालने कंगनाची तुलना क्रांतिकारक भगत सिंह यांच्याशी केली. तसेच सरकारसोबत वाद असूनही मजबूत राहण्यावर तिची प्रशंसा केली. विशाल ट्विट करून लिहिले की, 'क्वीन' महराष्ट्र सरकारचा सामना करत लोकांसाठी एक उदाहरण कायम करतेय की, काही चुकीचं झालं तर सरकार विरोधात आवाज उठवला गेला पाहिजे.

कंगनाची भगत सिंह यांच्याशी तुलना

अभिनेता-निर्माता विशाल म्हणाली की, 'प्रिय, कंगना तुझ्या हिंमतीला सलाम आहे. तू तुझा आवाज उठवताना हा विचार केला नाही की, काय चूक काय बरोबर आहे. हा तुझा व्यक्तिगत मुद्दा नव्हता. पण तरी सुद्धा सरकारच्या नाराजीचा सामना करत तू मजबूतपणे उभी राहिली. जे एक फार मोठं उदाहरण आहे. अशाच प्रकारचं काही १९२० मध्ये भगत सिंह यांनी केलं होतं'.

का वक्तव्यामुळे पेटला होता वाद 

मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राबाबत कंपनाने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ती म्हणाली होती की, तिला मुंबईत असुरक्षित वाटतं. मंबईची तुलना तिने पीओकेसोबत केली होती. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तिला मुंबईत परत येऊ नकोस असं बजावलं होतं. यानंतरच कंगनाने मुंबईची तुलना पीओकेसोबत केली होती. दरम्यान बीएमसीने बुधवारी अभिनेत्री कंगनाचं बांद्र्यातील ऑफिसमधील काही बेकायदेशी बांधकाम पाडलं होतं. ज्यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. 

कंगना विरोधात तक्रार दाखल

कंगनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा  CM Uddhav Thackeray एकेरी उल्लेख करणं महागात पडणार आहे. याबाबत वकील नितीन माने यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल अभिनेत्री कंगना राणौतविरोधात तक्रार दाखल केली आहे. नितीन यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार नितीश माने यांनी कंगना हिने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे तुझे क्या लगता है! कि  तुने फिल्म माफिया के साथ मिल के मेरा घर तोडकर बडा बदला लिया है असे बदनामीकारक व्हिडीओ अपलोड केला म्हणून तक्रार दाखल केली. 

शिवसेनेवर निशाणा

कंगना राणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, आज ते सत्तेसाठी ती विचारधारा विकून शिवसेना ते सोनिया सेना बनली आहे, ज्या गुंडांनी माझ्यामागे माझं घर तोडलं त्यांना सिविक बॉडी म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका अशा शब्दात कंगना राणौतनं शिवसेनेवर आरोप केला आहे.

कंगना राणौतनं ट्विट करुन सांगितलं आहे की, तुमच्या वडिलांचं चांगलं कार्य तुम्हाला पैसा देऊ शकतात पण सन्मान स्वत:ला कमवायला लागतो. माझं तोंड बंद कराल पण माझा आवाज लाखो लोकांपर्यंत पोहचेल. किती जणांची तोंडे बंद करणार? किती आवाज दाबणार? कधीपर्यंत सत्यापासून पळत राहणार तुम्ही काहीच नाही फक्त घराणेशाहीचं उदाहरण आहात अशी घणाघाती टीका कंगनानं केली आहे.त्याचसोबत निवडणुकीत हरल्यानंतर निर्लज्जपणे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करत शिवसेनेचं सोनिया सेनेत रुपांतर केले असंही कंगनानं म्हटलं आहे.

हे पण वाचा :

शिवसेना भेकड अन् घाबरट, कंगनाच्या आईचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

'माझी पण इच्छा आहे, माझ्या नावावर अशी बिल्डींग कुणीतरी करावी'

कंगना भाजपा किंवा रिपाईत आल्यास स्वागत; रामदास आठवलेंनी सांगितला चर्चेचा तपशील

Web Title: Tamil actor Vishal is all praise for Kangana Ranaut; compares her to Bhagat Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.