ठळक मुद्देतापसीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ‘सांड की आंख’, ‘रश्मी रॉकेट’, ‘थप्पड’ असे अनेक चित्रपट तिच्याकडे आहेत.

तापसी पन्नू बी-टाऊनच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. परखड बोलणारी अभिनेत्री अशीही तिची ओळख आहे. ट्रोल करणा-यांना अनेकदा फैलावर घेणारी तापसी प्रोफेशनल लाईफबद्दलही अगदी उघडपणे बोलते. स्वत:च्या खासगी आयुष्याबद्दल बोलायला मात्र तिला अजिबात आवडत नाही. पण प्रथमच तापसीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. होय, एका ताज्या मुलाखतीत तापसीने तिच्या लव्हलाईफबद्दल   खुलासा केला.


या मुलाखतीत तिला काही खासगी प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न तापसी चतुराईने टाळेल, असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण तापसीने हा अंदाज खोटा ठरवत, ती सिंगल नसल्याचे सांगितले. ‘मी लग्न केलेले नाही. पण मी सिंगलही नाही. माझे काही खरे हितचिंतक आणि माझ्याकडे केवळ गॉसिप म्हणून न बघणा-या काही लोकांना याबद्दल ठाऊक आहे. माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे. पण तो अ‍ॅक्टर वा क्रिकेटर नाही. याच्या जवळपासही फिरकणारा नाही,’असे तापसीने सांगितले. अर्थात ही व्यक्ती कोण, त्याचे नाव काय, हे सांगण्यास तिने नकार दिला.


लग्नाबद्दही ती बोलली. मला लहान मुले आवडतात. मूल हवे असेल तेव्हाच मी लग्न करेल. फार मोठे ग्रॅण्ड वेडिंग करण्यात मला अजिबात रस नाही. अगदी जवळचे मोजके कुटुंबीय व मित्रांच्या साक्षीने एका दिवसांत उरकेल, असे लग्न मला हवे. कारण अनेक दिवस चालणारे लग्न फार थकवणारे असते, असे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे माझे लग्न अगदी साधेपणाने होईल, असे ती म्हणाली.


तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ‘सांड की आंख’, ‘रश्मी रॉकेट’, ‘थप्पड’ असे अनेक चित्रपट तिच्याकडे आहेत.

Web Title: taapsee pannu confirms that she is in relationship talks about her boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.