ठळक मुद्देअनुराग कश्यप, तापसी पन्नूने केंद्र सरकारच्या  अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात  नेहमी उघडपणे भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची  टीका विरोधी पक्षाक

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप व अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. बुधवारी आयकर विभागाकडून अनुराग, तापसी, विकास बहल, विक्रमादित्य मोटवाने आणि मधू वर्मा मंटेना यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारण्यात आले. कर चोरीच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. या धाडसत्रानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर अगदी उघडपणे तापसी व अनुरागच्या समर्थनार्थ मैदानात उतरली. पण आता याचमुळे स्वरा ट्रोल होतेय.


स्वराने तापसी व अनुरागला पाठींबा देत, एक ट्विट केले होते. ‘तापसी ही साहसी व दृढ विश्वासू, अद्भूत मुलगी आहे. अलीकडे असे लोक दुर्लभ झाले आहेत. ती एक खंबीर व्यक्ति आहे आणि धाडसत्रानंतरही ताकदीने उभी आहे,’ असे तापसीसाठी तिने लिहिले होते. अन्य एका ट्विटमध्ये तिने अनुराग कश्यपचे कौतुक केले होते. ‘अनुराग सिनेसृष्टीतील एक प्रतिभावान गुरु आणि मार्गदर्शक आहे. निर्मळ आणि प्रचंड ताकदीचा माणूस आहे. तुला शक्ती मिळो,’ असे तिने लिहिले होते. 


मात्र तापसी व अनुरागला स्वराने पाठींबा देणे काही लोकांना रूचले नाही. त्यांनी स्वराला जबरदस्त ट्रोल करणे सुुरू केले. कदाचित स्वराला खूप दु:ख होतेय, असे एका युजरने लिहिले. अनेकांनी यासंदर्भात स्वराला ट्रोल करत मीम्सही व्हायरल केलेत.

अनुराग कश्यप, तापसी पन्नूने केंद्र सरकारच्या  अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात  नेहमी उघडपणे भूमिका मांडली आहे. एनआरसी, सीएएविरोधी कायदा, शेतक-याचे आंदोलनबाबत ट्वीट करून भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची  टीका विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. 

"…त्याचीच किंमत तापसी आणि अनुरागला चुकवावी लागतेय", सामनातून मोदी सरकारवर निशाणा

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: swara bhaskar troll for supporting taapsee pannu and anurag kashyap after it raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.